Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘सर्वांगीण विकासाचा ध्यास’; तुषार सहाणे

प्रभाग ८: इंद्रायणीनगरमध्ये तुषार सहाणेंचा झंझावाती प्रचार

पिंपरी-चिंचवड: प्रभाग क्रमांक ८ चा सर्वांगीण विकास हाच माझा एकमेव ध्यास असून नागरिकांना केवळ मूलभूत सुविधा नव्हे तर सुरक्षित व अत्याधुनिक परिसर देणे हे माझे उद्दिष्ट असल्याचा ठाम विश्वास महायुतीचे उमेदवार तुषार सहाणे यांनी व्यक्त केला. इंद्रायणी नगर, प्रभाग क्रमांक ८ मध्ये झालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. या दौऱ्यात त्यांनी विविध सोसायट्यांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेत विकासाचा आराखडा मांडला.

प्रचारादरम्यान सेक्टर १३ मधील कृष्ण दर्शन सोसायटी, बाबर-पोटे रेसिडेन्सी, शिवम रेसिडेन्सी, ओआसिस सोसायटी तसेच सेक्टर ११ मधील रिचवड सोसायटी येथे त्यांनी भेटी दिल्या. ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन तसेच महिलांकडून औक्षण करून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

हेही वाचा –  राहुल कलाटेंच्या प्रवेशाने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे बळ वाढले; शतप्रतिशतकडे वाटचाल

महिला सक्षमीकरणावर भर देताना तुषार सहाणे यांनी सांगितले की, प्रभागातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. महिलांना छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षणाची व्यवस्था प्रभागातच उपलब्ध करून दिली जाईल.

या दौऱ्यात नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन व सुरक्षिततेबाबत विविध प्रश्न मांडले. त्यावर उत्तर देताना सहाणे यांनी केवळ आश्वासन न देता नियोजित आराखड्याद्वारे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून प्रत्यक्ष कामातून उत्तर देण्याचे आश्वासन दिले. या जनसंपर्क मोहिमेत स्थानिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये तुषार सहाणे यांना नागरिकांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी तांत्रिक सुधारणा, महिला स्वावलंबनासाठी कौशल्य विकास केंद्राची उभारणी, स्वच्छता व पर्यावरणासाठी आधुनिक कचरा व्यवस्थापन प्रणाली, सुरक्षिततेसाठी मुख्य चौक व सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे तसेच अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व सक्षम पथदिव्यांची सोय हे विकासात्मक ‘व्हिजन’ आहे.

– तुषार सहाणे,युवा उद्योजक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button