Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लोकशाहीच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर, ‘मातोश्री’ भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांची ग्वाही

मुंबई : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे. संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजप संपवत आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी ‘मविआ’ व ‘इंडिया’ आघाडी काम करत आहे. भाजपविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्याबरोबर काँग्रेस आहे. लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेबरोबर एकत्र आहोत, अशी ग्वाही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर सपकाळ पहिल्यांदाच ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यास गेले होते.

‘प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार आजही तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रबोधन ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे, हे सांगितलेले आहे. ‘देवांचा धर्म व धर्माची देवळे’ पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आज भाजप धर्म बुडवायला निघाला आहे.

हेही वाचा –  ‘मी गृहमंत्री अमित शाह यांना बोलू का’? ईडीच्या अटकेआधी एकनाथ शिंदेचा मला फोन, राऊतांचा खळबळजनक दावा

भाजप लोकशाही व संविधान विरोधी आहे. लोकशाही, संविधान व शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढ्यात आगामी काळात बरोबर राहणे आवश्यक आहे’, असे सपकाळ म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात या वेळी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्थानिक नेतृत्वाला आघाडीचे अधिकार दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. या निवडणुकीची अधिसूचना निघाल्यावर मित्र पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी लोणार सरोवराचे छायाचित्र असलेले एक पुस्तक, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्राचे ‘फटकारे’ व पंढरपूरच्या वारीची फोटोग्राफी असलेले पुस्तक सपकाळ यांना भेट दिले. सपकाळ यांनीही लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावरील पुस्तक ठाकरे यांना भेट दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button