Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राधाकृष्ण विखे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पुणे-नाशिक रेल्वेसाठी जुनाच मार्ग हवा!

राहाता : पुणे-नाशिक जलदगती रेल्‍वे प्रकल्‍प जुन्‍या प्रस्तावित मार्गानेच कार्यान्‍वित करावा, ही लोकप्रतिनिधी आणि जनतेची भावना राज्‍य सरकारने केंद्रीय रेल्‍वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवावी अशी विनंती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सन २०१९ मध्ये संगमनेर-अकोले मार्गे तयार करण्‍यात आलेल्‍या या रेल्वे मार्ग प्रकल्‍प अहवालावरच कार्यवाही करण्‍याची आग्रही मागणी त्‍यांनी केली.

विखे यांनी आज, मंगळवारी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून पुणे -नाशिक रेल्‍वे मार्गाच्‍या, जिल्ह्यात निर्माण झालेल्‍या प्रश्‍नाच्या‌ पार्श्वभूमीवर भेट घेतली. विखे यांनी यापूर्वी या प्रकल्पाची वस्‍तुस्थितीही पत्राव्‍दारे मुख्‍यमंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली आहे. केंद्रीय रेल्‍वे विभागाने पुणे-नाशिक जलदगती रेल्‍वेचा प्रस्‍ताव २०१९ मध्ये नारायणगाव, संगमनेर, अकोले, सिन्‍नर असा तयार केलेला आहे.

जमीनींचे अधिग्रहनही करण्‍यात आले होते. मात्र या प्रस्‍तावात बदल करुन, हा मार्ग आता अकोले तालुक्‍याला वगळून नारायणगाव, संगमनेर, नाशिक अशा पध्‍दतीने प्रस्‍तावित करण्‍याची बाब समोर आल्‍यामुळे नागरीकांच्‍या भावना तिव्र झाल्‍या आहेत. प्रकल्‍पामध्‍ये बदल करताना कोणत्‍याही प्रकारे लोकप्रनिधींना विश्‍वासात घेण्‍यात आलेले नाही याकडेही मंत्री विखे यांनी मुख्‍यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

हेही वाचा –  ‘विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर देणारे व्हावे’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

सद्य परिस्थितीत रेल्‍वे मार्गाच्‍या प्रकल्‍प अहवालातील बदलांमुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्‍येही संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासकीय स्‍तरावर रेल्‍वे प्रकल्‍पाची कोणती कार्यवाही सुरु आहे याचीही माहीती उपलब्‍ध होत नाही. तसेच पुण्‍याहून नाशिककडे जाणा-या रेल्‍वे मार्गात नारायणगाव येथील ‘जेएमआरटी’ या रेडीओ टेलिस्‍कोप सेंटरची अडचण असल्‍याचे कारणही केंद्रीय रेल्‍वे मंत्र्यांनी लोकसभेमध्‍ये आपल्‍या निवेदनातून सांगितले आहे.

ही सर्व वस्‍तुस्थिती लक्षात घेवून रेल्‍वे मार्गाच्‍या प्रकल्‍पाबाबत वस्‍तुस्थिती समोर यावी यासाठी आपण सर्व लोकप्र‍तिनिधींची बैठक बोलवावी आणि प्रकल्‍पाच्‍या मार्गाबाबत असलेल्या भावना समजून घ्‍याव्‍यात. २०१९ मध्‍ये तयार केलेल्‍या प्रकल्‍प अहवालाची अंमलबजावणी होण्‍यासाठी राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून लोकप्रनिधी आणि जनतेच्‍या भावना केंद्रीय रेल्‍वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्‍यात अशी विनंती मंत्री विखे यांनी फडणवीस यांच्या चर्चे दरम्‍यान केली आहे. या रेल्वेमार्गात बदल केल्याने अकोले व संगमनेरमध्ये सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन आंदोलने सुरू केली आहेत.

राज्‍यात नुकत्‍याच झालेल्‍या नगरपालिका निवडणूकांमध्‍ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेल्‍या यशाबद्दल मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्री राधाकृष्‍ण विखे यांनी या भेटी दरम्‍यान अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button