‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’पासून ‘हिंदुत्वाचा बुलंद आवाज’: आमदार महेश लांडगे राज्यभर चर्चेत
सोशल मीडियावर व्हीडिओ, रिल्सचा धुरळा : शिव-शंभूप्रेमींची शंभूसृष्टीबाबत उत्सुकता शिगेला!
पिंपरी-चिंचवड: मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ या भव्य स्मारक प्रकल्पाच्या निमित्ताने, भाजपा आमदार महेश लांडगे यांची प्रतिमा राज्यभरात एक ठाम हिंदुत्ववादी नेतृत्व म्हणून उभी राहत आहे. ( Mahesh Landge ) छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा ज्या पद्धतीने ‘शंभूसृष्टी’द्वारे उभी केली जात आहे, ती केवळ सांस्कृतिक नव्हे तर राजकीय आणि वैचारिक घोषणाही ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ च्या कामाबाबत सोशल मीडियावर व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच, समाजमाध्यमांमधून नेटीझन्स आपली मते व्यक्त करीत आहेत.
हिंदू संस्कृती, इतिहास आणि अस्मिता यांचे प्रतीक
छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी निगडित असलेल्या मूल्यांचा प्रचार करताना, महेश लांडगे यांनी आपली ओळख सांस्कृतिक राष्ट्रवाद, धर्माभिमान आणि सामाजिक जागरूकता यांच्याशी जोडली आहे. त्यांनी जाणीवपूर्वक धर्मांतर, लव्ह जिहाद, व्होट जिहाद आणि गोसंवर्धन यांसारख्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडत हिंदुत्ववादी राजकारणाचा स्पष्ट चेहरा बनण्याकडे पावले उचलली आहेत.

गोसंवर्धन – हिंदुत्ववादी अजेंडामधील महत्त्वाचा मुद्दा ( Mahesh Landge )
महेश लांडगे यांनी गोसंवर्धनाचा प्रश्न वेळोवेळी सभागृहात व समाजमाध्यमांत मांडला आहे. त्यांचे स्पष्ट मत आहे की,
“गोवंश केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नाहीत, त्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहेत. गोरक्षण ही आपली जबाबदारी आहे, राजकारण नव्हे.”
त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात गोशाळा, गोरक्षकांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा आणि गोहत्याबाबत कारवाईबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. गोरक्षकांना प्रशासनाच्या संरक्षण मिळावे. यासह गोवंश रक्षणाच्या मुद्द्यावर लांडगे यांची भूमिका हिंदुत्ववादी विचारसरणीत फक्त धार्मिक नव्हे, तर आर्थिक आणि सामाजिक अधिष्ठानाने युक्त आहे. महराष्ट्रात बैलगाडा शर्यतींवर असलेली बंदी न्यायालयीन मार्गाने यशस्वीपणे जिंकणारा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत लढा उभा करणारा आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ‘व्होट जिहाद’बाबत सडेतोड भूमिका
-
धर्मांतर : गरिबी, फसवणूक किंवा लोभ यांच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतरांविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
-
लव्ह जिहाद : महिलांना लक्ष्य करून त्यांचं धर्मपरिवर्तन केल्याचे अनेक प्रकरणं समोर येत असल्याने त्यांनी त्यावर कठोर कायद्यांची मागणी केली आहे.
-
व्होट जिहाद : विशिष्ट धर्मीय गटांकडून संघटित मतदानाच्या माध्यमातून राजकीय हस्तक्षेप केल्याची टीका त्यांनी उघडपणे केली आहे.
विकासाभिमूख हिंदुत्व, पण घटनात्मक चौकटीत
महेश लांडगे यांची भूमिका अत्यंत ठाम असली तरी ती घटनात्मक चौकटीत राहणारी आणि विकासाभिमूख हिंदूत्व मांडणारी आहे. ते म्हणतात:
“हिंदुत्व म्हणजे दुसऱ्याच्या धर्माचा अपमान नव्हे, तर आपल्या श्रद्धांचे रक्षण आहे.”
त्यामुळेच त्यांनी हिंदू समाजाच्या भावना, परंपरा आणि सुरक्षिततेसाठी भूमिका घेत स्पष्टपणा राखला आहे.
स्थानिक नेता ते राज्यव्यापी प्रभाव
-
भोसरी मतदारसंघात मजबूत पकड असलेले महेश लांडगे आता पिंपरी-चिंचवड, पुणेसह राज्याच्या हिंदुत्ववादी चेहऱ्यांपैकी एक म्हणून उभे राहत आहेत. ‘शंभूसृष्टी’च्या माध्यमातून त्यांनी केवळ स्मारकच नव्हे, तर एक वैचारिक केंद्र उभं केलं आहे. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ हे जरी या प्रवासाचे दृश्य प्रतीक असले, तरी या मागे उभा आहे एक स्पष्ट विचार – धर्म, इतिहास, आणि अस्मिता यांचा जागर. आणि त्या जागराचा बुलंद आवाज आहे .
भविष्यातील राजकीय स्थान
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की,
“महेश लांडगे हे केवळ स्मारक उभं करत नाहीत, तर एक प्रभावी, वैचारिक, आणि भाजपासाठी उपयुक्त प्रभावशाली शक्तीकेंद्र तयार करत आहेत.”
त्यांचे हिंदूत्त्ववादी विचार, विकासकामांबाबतचे ठळक मुद्दे हाताळण्याची तयारी, आणि जनाधार यामुळे त्यांना भविष्यात राज्यस्तरीय भूमिका मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे जाणकारांचे मत आहे.







