पहलगामचे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले कशावरुन? पी. चिदंबरम यांचं वक्तव्य

P Chidambaram | माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) च्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. न्यूज पोर्टल ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सरकार आणि एनआयएच्या दाव्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यावरून वाद निर्माण झाला आहे.
पी. चिदंबरम म्हणाले, की NIA ने तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे का? ओळख पटवली असेल तर ते कुठून आले होते? पाकिस्तानातूनच आले कशावरुन? भारतातच तयार झालेले दहशतवादी नसतील हे कशावरुन? दहशतवादी पाकिस्तानातून आले होते याचा पुरावा काय? सरकारकडून पाकिस्तानशी संघर्ष करताना काय नुकसान झालं ते का लपवलं गेलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : योग्य वेळी सत्य बाहेर येईल; पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पोस्ट
ऑपरेशन सिंदूरला बरेच आठवडे झाले आहेत. पंतप्रधान म्हणतात ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही. जर ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही तर नंतर काय पावलं उचलली? पहलगामसारखा आणखी एखादा हल्ला झाला तर तो रोखण्यासाठी तयारी झाली आहे का? पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? हल्लेखोरांना अटक झाली असं सांगण्यात आलं, त्याचं काय झालं? खूप आमचे प्रश्न आहेत, असंही पी. चिदंबरम म्हणाले.





