Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

He Promises, He Delivers : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिनी शहरात लक्षवेधी ‘ब्रँडिंग’!

पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये फ्लेक्सची चर्चा : Driving force behind Maharashtra's progress

पुणे/पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारे, निर्णयक्षम नेतृत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात “He Promises, He Delivers”, “Action. Works. Speaks. Inspire”, तसेच “Happy Birthday to the driving force behind Maharashtra’s progress” अशा घोषवाक्यांनी सजलेले फलक झळकत आहेत.

या फलकांची संकल्पना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक उद्योजक अभयशेठ मांढरे मित्र परिवार असून, त्यांनी ही अभिनव शुभेच्छा मोहिम राबवली आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये, महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि सोशल मीडियावर हे फलक लक्षवेधी ठरत आहेत.

प्रगतीचा चेहरा अजित पवार…

अजित पवार यांनी राज्यातील शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग, युवक यांच्यासाठी घेतलेल्या ठोस निर्णयांमुळे त्यांची प्रतिमा एका कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख नेतृत्वकर्त्याची बनली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील जलसंपदा, वाहतूक, उद्योगवाढ, शिक्षण सुविधा यामध्ये त्यांनी दिलेल्या गतीमुळेच त्यांना “ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड महाराष्ट्रा’ज प्रोग्रेस” अशी ओळख लाभली आहे.

शब्द नाही, कृती बोलते… 

“Action. Works. Speaks. Inspire” या घोषवाक्यांद्वारे अजित पवार यांची कार्यपद्धती अधोरेखित केली जात आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनांचे प्रत्यक्षात रूपांतर विकासकामांमध्ये झाले आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे सामान्य नागरिकांचा विचार आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असते, हे या मोहिमेतून अधोरेखित करण्यात आले आहे.

समर्थकांची भावना:

अभयशेठ मांढरे आणि त्यांच्या मित्र परिवाराने ही शुभेच्छा मोहीम उचलून धरत, वाढदिवस केवळ औपचारिक न ठेवता, त्याला जनसंपर्क, कृतज्ञता आणि प्रेरणेचे स्वरूप दिले आहे. “अजितदादा म्हणजे शब्दाला मान आणि कृतीतून प्रेरणा” असा संदेश त्यांनी दिला आहे.


“He Promises, He Delivers” हे केवळ फलकावरील वाक्य नसून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा सार आहे. त्यांच्या कार्याने लाखो महाराष्ट्रवासीयांना विश्वास, दिशा आणि प्रगती दिली आहे.”
– अभयशेठ मांढरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button