मन:शक्ती प्रणीत ‘होमहवन’ उपक्रमातून धार्मिक चैतन्य
शिक्षण विश्व: संत साई विद्यालयातील संस्कार उपक्रम

पिंपरी | भोसरी येथील संत साई विद्यालयांमध्ये मनशक्ती प्रणित होम हवन उपक्रम राबविण्यात आला या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम वातावरण निर्माण होऊन धार्मिक चैतन्य देखील तयार होईल असे मत संस्थेचे संस्थापक व मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर यांनी सांगितले.
शाळेतील हा होम हवन गुरुवर्य संदान यांच्या मधाळ, प्रेमळ ,सुस्पसष्ट मंत्रोच्चाराने श्री गणेश पूजन, अग्निदेवता पूजन, विष्णुदेवता पूजन आपल्या संत साई इंग्लिश स्कूल च्या प्रांगणात धार्मिक, पारंपरिक पद्धतीने चैतन्यमय वातावरणात मन:शक्तीच्या आधारे होमहवन उत्साहात संपन्न झाला. महाराजांनी आपल्या शाळेची जागा विविध मंत्रोच्चार, जप, सात्विक तथा भूमी शांतीचा प्रयास केला. तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या सुख, समृद्धी, शांततेसाठी अग्निदेवतेला स्मरून आवाहन केले. जो इतरांना समजून घेणारा आहे तो देव माणूस जाणावा, जो इतरांना समजून न घेता त्रास देणारा आहे तो’दानव’समजावा. असे परखड मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. गायत्री मंत्रोच्चाराने सर्व विद्यार्थ्यांना होमाचे दर्शन घेण्याचे भाग्य आज लाभले.
हेही वाचा : मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंचा हिंदी भाषेवरुन राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघात
आपल्या गुरुची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या समजावी, गुरू म्हणजे साक्षात परमात्मा असल्याचे त्यांनी नमूद केले.जीवनात ५0%आध्यात्मिक संस्कारांची शिदोरी आणि५०% परिश्रम असतील तर यश हे सुलभ होऊ शकते.आपले माता, पिता, गुरू, यांच्या दर्शनाने रोज दिवसाची सुरुवात केली असता संस्कार क्षम जीवनचरित्र तयार होईल यावर त्यांनी विवेचनात्मक संबोधन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चयपाठ घेण्यात आला.
या यज्ञाचे आयोजन शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर, मुख्यध्यापिका सुनिता ढवळेश्वर, संचालिका पायल ढवळेश्वर यांनी केले.
हा यज्ञ यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी शिक्षिका मालन लिगाडे,भारती ढवळेश्वर, आरती मुट्टगीशेत्तर,संगिता पाटील, अक्षय राणे तसेच शाळेतील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





