Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

पक्षांतर्गत शीतयुद्ध: पुणे-पिंपरी-चिंचवड शिवसेनेत ‘सर्जिकल स्ट्राइक’?

शिवसेना शिंदे गटाची कार्यकारिणी स्थगित : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर सध्याचे पदाधिकारी प्रभारी

पुणे | पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला अपयश येण्यामागे पक्षांतर्गत शीतयुद्ध करणीभूत ठरल्याचे लक्षात आल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आले. दोन्ही शहरांतील कार्यकारिणी स्थगित करून सर्व पदाधिकाऱ्यांना ‘प्रभारी’ करण्यात आले आहे. त्यामुळे या पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाला यश मिळू शकले नाही. पुण्यात एकही नगरसेवक निवडून आला नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये सहाजण निवडून आले. पक्षाला मिळालेल्या या अपयशाला पक्षांतर्गत शीतयुद्ध कारणीभूत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ओपन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर दोन्ही शहरांतील कार्यकारिणीच स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उद्योगमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते उदय सामंत यांनी दोन्ही शहरांमधील कार्यकारिणी स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षातील मूळचे आणि बाहेरून आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. एक महिन्याने नवीन कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. काम करत नसलेल्यांना काढून टाकले जाणार असून, काही पदाधिकाऱ्यांना कायम ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख किंवा इतर महत्त्वाच्या पदांवर असलेले नेते आता केवळ ‘प्रभारी’ म्हणून काम पाहणार आहेत.

हेही वाचा     :              “संजय राऊत हे दुसरे अशोक खरात…”; अनिल पाटलांचे खळबळजनक वक्तव्य 

पिंपरी-चिंचवडमध्येही बदलाची शक्यता

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) पक्षाने संघटनात्मक फेरबदल केले. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे यांची नियुक्ती केली. उपजिल्हाप्रमुख असलेले राजेश वाबळे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. जिल्हाप्रमुख असलेल्या बाळासाहेब वाल्हेकर यांच्याकडे पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघांच्या समन्वयकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मावळ तालुकाप्रमुख असलेले राजेश खांडभोर यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली. खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्त्वाखाली या कार्यकारिणीने महापालिकेची निवडणूक लढविली. मात्र, त्यांना सहा जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे काही पदाधिकारी बदलले जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

गटबाजी वाढणार?

नवीन कार्यकारिणीत स्थान मिळावे, यासाठी आता प्रत्येकजण प्रयत्न करणार आहे. त्यातून गटबाजी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नवीन कार्यकारिणीत डावलले गेल्यास या पक्षाला आणखी गळती लागण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button