Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पार्सल पाठवायचे आहे? चिंचवड पोस्ट ऑफिस मध्ये “वन स्टॉप सोल्युशन”!

पोस्ट ग्राहकांसाठी सुविधा : सर्वसामान्य नागरिकांसाठी होणार लाभदायी

पिंपरी | भारतीय टपाल विभागाच्या पुणे शहर पूर्व विभागाच्या वतीने चिंचवड पूर्व टपाल कार्यालयामध्ये स्वतंत्रपणे “पार्सल पॅकेजिंग युनिट”(पीपीयू)नव्याने कार्यान्वित करण्यात आलेले आहे.

सर्वसामान्य नागरिकांची व व्यावसायिकयांची गरज लक्षात घेऊनभारतसरकारच्यासंचार मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय टपाल विभागानेअतिशय कमी किमतीत व जलदविश्वासू सेवा देण्याच्याउद्देशानेआपल्या नातेवाईकांना किंवा व्यावसायिक उद्देशाने पाठविण्यात येणाऱ्या पार्सल यांनाएका छताखाली सर्वसेवादेण्याच्या उद्देशाने पार्सल पॅकेजिंग युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी ग्राहकांना ज्या वस्तू पाठवायच्या आहेत त्या घेऊन चिंचवड पूर्व टपाल कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये टाकून व स्वतंत्रपणे त्याची पॅकिंग करून पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या वेगवेगळ्या क्षमतेच्या बॉक्सची किंमत देखील बॉक्सच्या आकारानुसार किफायतीशीर खालील दराने ठेवण्यात आलेली असून बॉक्सच्या आकारानुसार पॅकेजिंग चे दर ठेवण्यात आलेले आहे. तसेच पोस्ट ऑफिस मध्ये गेल्यानंतर रांगेमध्ये देखील थांबण्याची गरज नाही यासाठी स्वतंत्र काउंटरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

हेही वाचा      :      ‘‘हिंजवडी आयटी पार्क’’साठी मुख्यमंत्र्यांकडे “व्हिजन” 

भारतीय टपाल विभागाच्या व्यवसाय विपणन आणि व्यवसाय वृद्धी या उद्दिष्ट पूर्तीच्या हेतूनेसर्वसामान्य नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचा लाभ पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व नागरिक,व्यावसायिक यांनी घ्यावा असे आवाहन पुणे शहर पूर्व विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर,भारतीय टपाल सेवेचेसनदी अधिकारी मा श्री समीर महाजन साहेब यांनी केले आहे. तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून पाठवण्यात येणाऱ्या पार्सलच्या सर्व सुविधांसाठी पिंपरी चिंचवड विभागाचे विपणन अधिकारी श्री संदीपबटवाल(मोनं 7028007234) या संपर्क क्रमांकावरसंपर्क करण्याचे आवाहन पुणे शहर पूर्व विभागाच्याद्वारे देण्यात आलेल्या वृत्तसंस्था निवेदनामध्ये करण्यात आलेले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button