Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारताचे नुकसान झाल्याचा एक फोटो दाखवा; ऑपरेशन सिंदूरवरून अजित डोवाल यांचे परदेशी माध्यमांना आव्हान

Ajit Doval : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आयआयटी मद्रासच्या ६२व्या पदवीदान समारंभात बोलताना ‘ऑपरेशन सिंदूर’वरून परदेशी माध्यमांनी केलेल्या आरोपांना ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिले. या वेळी त्यांनी ऑपरेशनच्या अचूकतेचे, तांत्रिक क्षमतेचे आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या यशाचे जोरदार कौतुक केले.

डोवाल यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की, ऑपरेशनदरम्यान भारतात काहीही नुकसान झालेले नाही, आणि परदेशी माध्यमांनी केलेले दावे तथ्यहीन आहेत. त्यांनी परखड शब्दांत विचारले, “भारताच्या कुठल्याही भागात नुकसान झाल्याचा एक ठोस पुरावा दाखवा. एक फोटो दाखवा – अगदी एक काचेचा तुकडा जरी फुटलेला दाखवला तरी बघू.”

ते पुढे म्हणाले की, ऑपरेशनमध्ये २३ मिनिटांच्या आत पाकिस्तानच्या अंतर्गत भागात असलेल्या ९ लक्ष्यांवर अचूक हल्ले करण्यात आले. “सगळी लक्ष्ये हिट केली गेली. कुठेही चुकून हल्ला झाला नाही,” असा ठाम दावा त्यांनी केला.

हेही वाचा – ‘‘हिंजवडी आयटी पार्क’’साठी मुख्यमंत्र्यांकडे “व्हिजन”

परदेशी माध्यमांवर टीका करताना डोवाल यांनी नमूद केले की, न्यूयॉर्क टाईम्ससारख्या वृत्तपत्रांनी काही उपग्रह छायाचित्रं सादर केली होती, पण ती पाकिस्तानातील १३ एअर बेसची होती. “मग भारतात काय नुकसान झालं याचा पुरावा कुठे आहे?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

डोवाल यांनी यावेळी ऑपरेशनमध्ये वापरलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे विशेष कौतुक करत सांगितले की, “आपण वापरलेली यंत्रणा पूर्णतः भारतीय होती, आणि हे एक मोठे यश आहे.” त्यांनी हे यश भारताच्या तांत्रिक प्रगतीचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असल्याचे म्हटले.

त्यांचे हे विधान भारताच्या संरक्षण धोरणातील पारदर्शकता आणि आत्मविश्वास दाखवणारे ठरले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत त्यांनी दिलेली माहिती ही सामरिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची मानली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button