‘लाडकी बहिण’ योजनेवर नीलम गोऱ्हे यांच मोठं विधान; विधिमंडळातील कामकाजावर केले भाष्य

Dr. Neelam Gorhe : विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा. निलम गोऱ्हे या पुणे दौऱ्यावर आल्या असता त्यांनी विधिमंडळाचे अधिवेशन काळ ३ ते २६ मार्च या कालावधीत पार पडला असून यामध्ये विधानपरिषदेत ११५ तास, तर विधानसभेत १४६ तास कामकाज चाललल्याची माहिती दिली. विधीमंडळाचे हे अर्थसंकल्पवीय अधिवेशन विविध मुद्यांनी गाजले. विधानपरषिदेतही सत्ताधारी आणि विरोध यांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडले. यावर गोऱ्हे यांनी आपले मत व्यक्त केले.
विधिमंडळात महिलांबाबत अपशब्द वापरण्यासारखे प्रकार झाले. विधिमंडळात हीन प्रवृत्तीची भाषणे ऐकली. त्यातून काहींचा हिरोगिरी करण्याचा हेतू असू शकतो. मात्र, कोणत्या शब्दांचा वापर करू नये, याचे भान असल्याचे दिसत नाही. याबाबत मतदारांनीच प्रश्न विचारले पाहिजेत. काही लोकांनी वातावरण गढूळ केले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विधानपरिषदेत विविध विषयांवर प्रश्नोत्तरे आणि चर्चा झाली असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.
हेही वाचा – १ एप्रिलपासून सर्व वाहनांना FASTag बंधनकारक; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार
अहिल्याबाई होळकर जन्म त्रिशताब्दी, महिला पंचदशकपूर्तीनिमित्त ठराव, राज्यघटनेला ७५ वर्षे या विषयावर ठराव करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी देणार हे कधीच कोणी सांगितले नव्हते. राज्य सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प झाला आहे. त्यामुळे महिलांना २१०० रुपये कधी मिळणार हे आताच सांगता येणार नाही. त्यासाठी पाच वर्षे वाट पाहायला लागेल. योग्य वेळ येताच ते होईल, असे विधान डॅा. नीलम गोऱ्हे यांनी केले. पुण्यातील शिवाजीनगरचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज नगर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री, पुणे महापालिका आयुक्तांना दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेत सर्वच खोक्याभाई असल्याचे विधान केले होते, हे विधान हक्कभंगासाठी पात्र होऊ शकते, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.





