Fastag Compulsory | १ एप्रिलपासून सर्व वाहनांना FASTag बंधनकारक; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार

Fastag Compulsory | राज्यातील सर्व वाहनांना आता फास्टॅग बंधनकारक करण्यात आला असून या संदर्भातील निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच मंजूरी दिली होती. आता या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून करण्यात येणार आहे. तसेच १ एप्रिल २०२५ नंतर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग असणं अनिवार्य असणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व टोल प्लाझांवर आता फास्टॅगद्वारे पैसे भरणे बंधनकारक असणार आहे. मात्र जे वाहनधारक या पद्धतीचा स्वीकार करणार नाहीत किंवा या पद्धतीने शुल्क भरण्यास असमर्थ असतील तर त्या वाहनधारकांना 1 एप्रिलनंतर दुप्पट टोल भरावा लागणार आहे.
हेही वाचा : Udayanraje Bhosale | सरकार काय बोळ्याने दूध पितं का? उदयनराजे भोसले भडकले
एमएसआरडीसीसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व पथकर नाक्यांवर आता १ एप्रिलपासून फास्टॅग प्रणालीद्वारे पथकर वसुली केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी त्यापूर्वी फास्टॅग स्टिकर खरेदी करून त्याचा वापर सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल.