शिक्षण विश्व: नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेकडून अंकिता गावडे हिचा सत्कार!
प्रेरणादायी यश; अंकिता गावडे हिची महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारीपदी निवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/pune-40-780x470.jpg)
पिंपरी- चिंचवड : आंबेगाव तालुक्यातील जवळे गावची कन्या अंकिता रमेश गावडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले असून महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारीपदी तिची निवड झाली आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल तिचा नवनिर्माणबंजारा क्रांती सेना पुणे जिल्हा अध्यक्षप्रताप राठोड यांच्याकडून सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
हेही वाचा – अध्यात्मिक: श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माण कार्यात हातभार लावूया!
सत्कार प्रसंगी प्रताप राठोड म्हणाले, सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अंकिताला एक लहान बहीण व भाऊ आहे आणि आई गृहिणी आहे. तिच्या वडिलांचे २०२१ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांच्या दूध विक्री व्यवसायाची जबाबदारी अंकिताची बहीण आणि कुटुंबाने आपल्या खांद्यावर घेतली. अंकिताने देखील अशा परिस्थितीत खचून न जाता जिद्द ठेवून शिक्षण सुरू ठेवले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बायोटेक्नॉलॉजीची पदवी संपादन केली, तसेच पुढे एमपीएससीसारख्या अवघड परीक्षेचे शिवधनुष्यही लीलया पेलून दाखवले.
अंकिताने संघर्षांतून मिळवलेलं हे यश ग्रामीण भागातील मुलींसाठी नक्कीच प्रेररणादायी असल्याचे प्रताप राठोड म्हणाले.