Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
खेडचे माजी आमदार, शिवसेना नेते सुरेश गोरे यांचे निधन

पिंपरी | प्रतिनिधी
खेड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आणि शिवसेना नेते सुरेश गोरे यांचे निधन झाले.
श्री. गोरे यांच्यावर गेले २० दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र अपयश आले. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास गोरे यांनी अखेरचा श्वास घेतला.
मागील 25 दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे माग पत्नी, मुलगा, भाऊ आणि आई असा परिवार आहे.
2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत ते खेड आळंदी मतदार संघातून आमदार झाले होते. गोरे हे चाकण जिल्हा परिषद गटाचे सदस्य व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देखील होते.





