नवरात्रीच्या नवव्या माळेला करा कन्या पूजन; जाणून घ्या शुभ मुहूर्त..
Navratri Kanya Pujan | शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता ही विजयादशमीनंतर होते. यावेळी अष्टमी आणि नवमी तिथीला फार महत्त्व आहे. या दिवशी कन्या पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी कुमारिकांना घरी बोलावून त्यांना जेवण दिलं जातं. तसेच, त्यांची पूजा केली जाते. तर आज आपण नवमी तिथीचा शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊयात.
नवरात्रीची नवमी तिथी कधी?
आज नवरात्रीची नवमी तिथी आहे. नवरात्रीची नवमी तिथी ही देवी दुर्गेला समर्पित आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.
हेही वाचा – पुण्यात पुन्हा ‘हिट अँड रन’, फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
नवरात्रीत नवव्या दिवशी कन्या पूजनाबरोबरच देवीचे हवन आणि पूजन देखील केले जाते. या दिवशी देवीच्या सिद्धीदात्री रुपाची पूजा करतात.
हवन आणि कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त हा दुपारी १२ वाजून ७ मिनिटांपासून ते दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे या वेळेत तुम्ही कन्या पूजन करू शकता.