Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमुंबईराष्ट्रिय
पुणे बंद ः पोलिसांचा कडक बंदोबस्त, शहरात शुकशुकाट
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी।
बंदमुळे शहरातील व्यवहारावर परिणाम झाला. पीएमपी बस सेवा तसेच रिक्षाही बंद आहेत. शहरातील हाॅटेल, दुकाने बंद आहेत. सकाळपासून शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला.डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात येणार आहे.
लक्ष्मी रस्तामार्गे मोर्चा शिवाजी रस्त्यावर लाल महाल चौकात जाणार आहे. माेर्चाच्या मार्गावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. माेर्चाच्या मार्गावर लक्ष्मी रस्ता परिसरात दुतर्फा भगवे झेंडे लावण्यात आले आहे.हडपसर, कात्रज, नगर रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, कोथरुड, वारजे, येरवडा परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.





