पुण्यात पुन्हा ‘हिट अँड रन’, फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

Pune Hit And Run | पुण्यात हीट अँड रनच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मे महिन्यात एका मद्यधुंद बिल्डर पुत्राने अलिशाल पोर्शेने दोघांना चिरडले होते. या घटनेनंतर पुन्हा गुरुवारी रात्री एका आलीशान मोटारीने कोरेगाव पार्क येथील गूगल बिल्डिंगसमोर दोन दुचाकींना धडक दिली असून यात एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहे.
घटनेनंतर आरोपी हा फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्याला करसह अटक केली आहे. ही घटना रात्री १ ते १.३० च्या सुमारास घडली. रौफ अकबर शेख असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणांचे नाव आहे. तर आयुष प्रदीप तयाल (वय ३४, रा. हडपसर) असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी त्याच्या घरून अटक केली आहे.
हेही वाचा – रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न मिळावा; राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव वेगात असलेल्या आलीशान मोटारीने एका एक्टिवावरील तिघांना धडक दिली. या गाडीवरील तिघे जण जखमी झाले. यानंतर मोटारीने समोर एक्सेस गाडीवरून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या गाडीवर फूड डिलिव्हरी बॉय रौफ अकबर शेख जात होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने नोबल हॉस्पिटल येथे उपचारांसाठी भरती करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.





