Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Mission Assembly Election: मोशी, डुडुळगावचा चेहरा मोहरा बदलणार : अजित गव्हाणे

मोशी, डुडुळगावातील नियमित पाणीपुरवठ्यासाठी प्राधान्य

सोसायटी धारकांशी संवाद ; परिवर्तनाचा दिला नागरिकांना विश्वास

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जास्त ‘डेव्हलपमेंट’ डुडुळगाव परिसरात होत आहे. मोशी, डुडुळगाव तसेच लगतच्या चऱ्होली या गावांचे क्षेत्र शहरात सर्वात मोठे आहे. विकास आराखड्यातील मंजूर रस्ते, शैक्षणिक संस्था, पाण्याची उपलब्धता, दळणवळणाच्या सुविधा हे सर्व काही असताना योग्य नियोजन अभावी हा भाग पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांपासून आजही वंचित राहिला आहे. त्यामुळे शहरातील सर्वात जास्त ”पोटेन्शियल” असलेला हा परिसर तुलनेने मागे पडला आहे. या भागाला प्राधान्याने योग्य नियोजन देत मोशी, डुडुळगावचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले. तसेच येथील नागरिकांनीही प्रगतीच्या वाटेने जाण्यासाठी ‘परिवर्तन’ करणार असल्याचा विश्वास दिला.

मोशी, डुडुळगाव परिसरात (दि.15) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी विविध सोसायटी धारकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नगरसेवक धनंजयभाऊ आल्हाट, लक्ष्मण सस्ते, मंदा आल्हाट, युवा नेते नितीन सस्ते, प्रदीप तापकीर, तानाजी तळेकर, सागर बोराटे, अनिल कुदळे, मोरेश्वर आल्हाट, किरण तळेकर, आकाश बनकर, आप्पासाहेब सस्ते, विशाल सस्ते, सूरज कुदळे ,निलेश बोरकर, सागर बनकर, दयानंद सस्ते, संजय तापकीर, निखिल सस्ते, निखिल बोराटे, प्रकाश आल्हाट, विशाल सस्ते, भानुदास सस्ते, हरीश कुदळे, मयुर कुदळे, दत्ता आल्हाट, केतन हवालदार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. अजित गव्हाणे यांनी केसर ट्री टाऊन, इनफ्लिनिटी प्लॅनेट, डेस्टिनेशन ऑस्टीया, स्टेला, आरंभ, वंदे मातरम, मंगलम ब्रिज, मंगलम पॅराडाईज् , अमूल्यम सोसायटी, वेंचर सिटी, गोविंद बाग, शामा इस्टेट आदी सोसायटीमध्ये संवाद साधला.

हेही वाचा    –    पद्मश्री ना. धों. महानोर यांनी शेतकरी जीवन मांडले; काशिनाथ नखाते 

यावेळी सोसायटी धारकांनी रस्त्यावरील अतिक्रमणे, खड्डे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, विस्कळीत असणारा पाणीपुरवठा याबाबत अक्षरशः तक्रारींचा पाढा अजित गव्हाणे यांच्यासमोर वाचला. सर्वात वेगाने डेव्हलप होणारा परिसर असूनही पाणी, वीज यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठी नाहक त्रास सहन करावा लागतो असेही सोसायटी धारकांनी सांगितले.

यावेळी अजित गव्हाणे म्हणाले, मोशी, डुडुळगाव तसेच लगतच्या चऱ्होली यासारख्या गावांचा विचार केला तर शहरात तुलनेने सर्वात मोठे क्षेत्र या गावांचे आहे. विकास आराखड्यातील मंजूर रस्ते, विविध शैक्षणिक संस्था, निसर्ग संपन्नता, दळणवळणाच्या सोयी हे सर्व काही असताना केवळ गेल्या दहा वर्षातील नियोजनाचा अभाव

या गावांचा विकासाच्या मार्गात अडथळा ठरला आहे. रस्त्यांची खड्ड्यांमुळे वाट लागली आहे. पाणी वाटपाचे कोणतेही नियोजन या भागात नाही. मनमानी पद्धतीने पाणीवाटप केले जाते असे येथील नागरिकांचे आरोप आहेत. एकाच भागात पाणीपुरवठ्याबाबत सोसायट्यांना वेगवेगळे अनुभव येत आहे. या भागात प्रचंड नागरिकरण वाढत असताना वीज पुरवठ्याबाबत सक्षम यंत्रणा उभारण्याबाबत आमदारांनी गेल्या दहा वर्षात ठोस उपाययोजना केली नसल्याचे दिसून येते. या भागात ट्रान्सफॉर्मर वाढवणे गरजेचे असताना आहे त्याच यंत्रणेवर अजूनही वीज पुरवठा होत असल्यामुळे वीज पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी येथील नागरिकांच्या आहेत. आगामी काळात या तक्रारींचे निराकरण करण्याबरोबरच या भागाचा चेहरा मोहरा कसा बदलेला याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही गव्हाणे यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button