पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर शहर कुमार निवड चाचणीत १२० कुस्तीपटूंचा सहभाग
राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात होणार

पिंपरी | पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर शहर कुमार निवड चाचणी कुस्ती स्पर्धा कावेरीनगर क्रिडा संकुल वाकड येथे संपन्न झाली. या निवड चाचणी स्पर्धेत १२० कुस्तीगीर यांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आयोजित राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा पुढील ऑक्टोबर महिन्यात होणार असून या अनुषंगाने, सदर निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
सदर स्पर्धा १५, १७, व २० वर्षाखालील फ्रिस्टाईल/ ग्रिकोरोमण मुले मुली अशी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेची उद्घाटन पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंतभाऊ गावडे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष अरूण तांबे, सरचिटणीस संतोष माचुत्रे, ताराचंद कलापुरे, भारत केसरी पैलवान विजय गावडे, पप्पू काळभोर, खंडूभाऊ वाळुंज, किशोर नखाते, राहुल लांडगे, विजय कुटे, विशाल नखाते, विवेक शेलार, अमित पांढारकर, आनंद गावडे आदी जण उपस्थित होते.
हेही वाचा – ‘राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देणार’; शिंदे गटातील नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
निकाल पुढीलप्रमाणे..
१५ वर्षाखालील (फ्रिस्टाईल) मुले : ३८ किलोगट : १) सार्थक फुगे – भोसरी, २) रूद्र जमदाडे – भोसरी, ४१ किलोगट : १) महेश खोसे – पिंपळे निलख, २) कृष्णा गोंडे – भोसरी, ४४ किलोगट : १) ओम नखाते – रहाटणी, २) सचिन देवासी – पिंपळे निलख, ४८ किलोगट : १) जय गोडांबे – रहाटणी, २) स्वजल दळवी – पिंपळे निलख, ५२ किलोगट : १) दिपक भालेघरे – चर्होली, २) सार्थक वहिले – डुडुळगांव, ५७ किलोगट : १) आशिष खरात – वाकड, २) राज पाडुळे – थेरगाव, ६२ किलोगट : १) रणजित हिप्परकर – रहाटणी, २) ज्ञानेश्वर डाकवाले – काळेवाडी, ६८ किलोगट : १) चैतन्य हिप्परकर – रहाटणी, ७५ किलोगट : १) श्लोक ताम्हाणे – चिखली, ८५ किलोगट: १) आर्यन पाडुळे – थेरगांव.
१५ वर्षाखालील (ग्रिकोरोमण) मुले: ३८ किलोगट : १) साई कांबळे – रहाटणी, २) रूद्र माने – भोसरी, ४१ किलोगट : १) सुरज देवकाते – रहाटणी, ४४ किलोगट : १) अर्जुन पालवे – वाकड, ४८ किलोगट : १) विराज लांडगे – भोसरी, २) मंथन लोंढे – भोसरी, ५२ किलोगट : १) प्रणव लांडगे – भोसरी, ५७ किलोगट : १) शौर्य खेडकर – रहाटणी, २) ॠतूराज लांडगे – भोसरी, ६२ किलोगट : १) आर्यन गायकवाड – भोसरी, ७५ किलोगट : १) ओमसाई मुळे – भोसरी, ८५ किलोगट : १) प्रज्ञेश कुटे – आकुर्डी.
१५ वर्षाखालील (फ्रिस्टाईल) मुली: ४२ किलोगट : १)खुशी देवरे, ५० किलोगट : १) खुशी रायका – आकुर्डी, ६२ किलोगट : १) हिंदवी म्हस्के – भोसरी, ६६ किलोगट : १) अक्षरा तापकीर – चर्होली.
१७ वर्षाखालील मुले (फ्रिस्टाईल): ४५ किलोगट : १) उदय जाधव – भोसरी, ४८ किलोगट: १) कृष्णा तिकोणे – चर्होली, ५१ किलोगट: १) सारंग बोऱ्हाडे – मोशी, ५५ किलोगट : १) शाम कदम -रहाटणी, ६० किलोगट: १) अभिनव वहिले – डुडुळगाव, ६५ किलोगट: १) मानव सदरे – पिंपळे निलख, २) वरद कवितके – रहाटणी, ७१ किलोगट: १) ओमकार हिंगणे – मोशी २) वेदांत जवळकर – कासारवाडी, ८० किलोगट : १) साहिल नखाते – रहाटणी, ९२ किलोगट : १) रूद्रराज नढे – काळेवाडी, ११० किलोगट: १) सक्षम तापकीर – चर्होली, २) आदर्श चव्हाण – मोशी.
१७ वर्षाखालील मुले (ग्रिकोरोमण) मुले: १) आदित्य किरदक – भोसरी, ४८ किलोगट : १) मल्हार गवळी – भोसरी, ५१ किलोगट : १) ओमकार सुतार – रहाटणी, ५५ किलोगट: १) सार्थक किठे – चिखली २) साई तांबे – रहाटणी, ६० किलोगट : १) शिवम फुगे – भोसरी, ६५ किलोगट : १) ज्योतिरादित्य मुळे – भोसरी, ७१ किलोगट : १) सुशील ठवरे – थेरगाव २) सुरज कविटकर – भोसरी, ८० किलोगट : १) सोहम पाडुळे – थेरगांव २) आदित्य रणदिवे – चिंचवड, ९२ किलोगट : १) ओम नखाते – रहाटणी २) श्रेयस काळे – भोसरी, ११० किलोगट : १) स्वराज काळभोर – आकुर्डी,
२० वर्षाखालील (फ्रिस्टाईल) मुले, ६५ किलोगट : १) प्रतिक धिमधिमे – चर्होली, ७० किलोगट : १) जयेश शेलार – भोसरी, ७४ किलोगट : १) यश नखाते – रहाटणी, ७९ किलोगट: १) अथर्व तांबे – रहाटणी, ८६ किलोगट : १) पृथ्वीराज जाधव – वाकड, ९२ किलोगट : १) विश्वजीत कोंडे – पिंपळे निलख, ९७ किलोगट : १) सौरभ जाधव – दिघी, १३० किलोगट : १) प्रतिक जाधव – एच, ए तालीम, २० वर्षाखालील (ग्रिकोरोमण) मुले : ५५ किलोगट : १) सुमित सालगुडे – चिखली, ६० किलोगट : १) अजिंक्य माचुत्रे – चिंचवड, ६३ किलोगट : १) वेदांत जाधव – भोसरी, ६७ किलोगट : १) ओमकार नलावडे – एच, ए, तालीम, ७२ किलोगट : १) प्रणव कुटे – आकुर्डी, ७७ किलोगट : १) अर्जुन कापसे – रहाटणी, ८२ किलोगट :१) अजिंक्य सांडभोर – चिखली, ८७ किलोगट : १) हर्ष नखाते – रहाटणी, ९७ किलोगट : १) यश नखाते – रहाटणी, १३० किलोगट : १) पृथ्वीराज नढे – काळेवाडी, २० वर्षाखालील (फ्रिस्टाईल) मुली : १) निर्मती मुर्हे – मोशी, ६२ किलोगट : १) प्रगती गायकवाड – निगडी.





