breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोसायटीधारकांच्या न्यायहक्कांसाठी प्रशासनाचा ‘संवाद’

चिखली-मोशी-चऱ्होली पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचा पुढाकार

महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची उपस्थिती

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदार संघातील सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्याकरिता तसेच शहराच्या विकासासाठी सूचना व संकल्पना मांडण्यासाठी ‘संवाद सोसायटीधारकांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

चिखली-मोशी-चऱ्होली- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी लक्ष्मी चौक, चिखली येथील सिझन बॅन्क्वेट हॉल येथे सकाळी १० वाजता ‘संवाद सोसायटीधारकांचा’ हा कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा     –        महिला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनास ‘बीसीसीआय’चा नकार

या कार्यक्रमासाठी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सोसायटीधारकांशी विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

सहभागी होणाऱ्या सभासद आणि प्रतिनिधींनी आपल्या तक्रारी, सूचना सोसायटीच्या अधिकृत लेटरहेडवर दि. २० ऑगस्टपर्यंत [email protected] या ई-मेलवर आणि 8956216390 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन सोसायटी फेडरेशनकडून करण्यात आले आहे.

महापालिका व पोलीस प्रशासनाशी निगडी, तळवडे, चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी, भोसरी या भागातील सोसायटीधारकांचा सुसंवाद व्हावा. याकरिता ‘संवाद सोसायटीधारकांचा’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महापालिका संबंधित रस्ते, पाणी, कचरा, नागरी आरोग्य, आरक्षणांचा विकास याबाबतच्या समस्या तसेच पोलीस प्रशासनाशी संबंधित वाहतूक कोंडी, अवैध व्यवसाय, नागरी सुरक्षा अशा तक्रारी व सूचना मांडण्यासाठी सोसायटीधारकांनी सहभागी व्हावे. प्रत्येक सोसायटीतून दोन अधिकृत सदस्य या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहेत. या कार्यक्रमातून सोसायटीधारकांच्या तक्रारी व सूचना प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचा संकल्प आहे.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button