कल्याण येथील सभेत नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्याची संधी!
ठाणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा; राममंदिराची प्रतिकृती, सेल्फी पॉईंटचीही व्यवस्था
कल्याणः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कल्याण येथे ठाणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आधारवाडी परिसरात ही जाहीर सभा होणार आहे. कल्याण, भिवंडीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिम येथील नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे मोठे कटआऊट पोस्टर लावण्यात आले आहेत. याठिकाणी सेल्फी पॉईंट तसेच राममंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. सुमारे 1 लाखाहून अधिक लोक या ठिकाणी या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज सकाळपासूनच या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केलेली आहे.
आयोध्या राम मंदिराचा देखावादेखील येथे उभारण्यात आला आहे. या सभेसाठी जे नागरीक, पदाधिकारी, कार्यकर्ते येतील त्यांना सेल्फी काढण्यासाठी सेल्फी पॉईंट बनविण्यात आला आहे. सकाळपासूनच या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी समर्थकांनी गर्दी केली आहे. या सभेसाठी सुमारे 1 लाखाहून हजारहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरसोबत समर्थक, सेल्फी काढून सोशल मीडियाच्या पोस्ट करत आहेत.
पंतप्रधानांसोबत सेल्फी काढणे सामान्य नागरिकांना शक्य होत नाही. हीच सामान्य माणसांची गैरसोय पाहता कल्याण येथे चक्क पंतप्रधानांचा मोठा कटआऊट उभारून सेल्फी पॉईंट बनविण्यात आला आहे. त्यामुळे कोणीही या ठिकाणी पंतप्रधानांच्या प्रतिमेसोबत सेल्फी काढून आपली हौस भागवू शकतो. नेमका हाच हेतू समोर ठेऊन या ठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती व सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.





