वाल्हेकरवाडी येथे श्री रामकथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उत्साहात
श्री. चिंतामणी मित्र मंडळाचा पुढाकार; विविध मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन
![Shri Ram Katha and Granthraj Dnyaneshwari Parayana in Valhekarwadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Shankar-Jagtap-780x470.jpg)
पिंपरी | श्री चिंतामणी गणेश मित्र मंडळ व वाल्हेकरवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने गणेश जयंतीनिमित्त प्राधिकरण आहेरनगर चिंचवड येथे भव्य रामकथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक ४ ते शनिवार १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत हा कार्यक्रमाचे होणार असून, विविध मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कीर्तनकारांची कीर्तन सेवा सायंकाळी ७ ते १० पर्यंत होणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, तात्यासाहेब आहेर, नामदेव ढाके, शेखर चिंचवडे, योगेश चिंचवडे, नीलेश भोंडवे, मंडळाचे अध्यक्ष निलेश आहेर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
हेही वाचा – छगन भुजबळांचं ‘त्या’ वक्तव्यावरून स्पष्टीकरण; म्हणाले,’सर्व नाभिक आणि मराठा..’
११ फेब्रुवारी रोजी रामकथा प्रवक्ते विदर्भरत्न रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर (अकोला) यांचे प्रवचन होणार आहे. तर सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत हभप संतोष महाराज पायगुडे (मांडवी, पुणे) यांचे कीर्तन होणार आहे. तर १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेदरम्यान हभप प्रभुराज पुरुषोत्तम पाटील (आळंदीकर) यांचे कीर्तन होईल. दि. १३ फेब्रुवारी सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान हभप उद्धव महाराज कोळपकर (चिंचवड) यांचे काल्याचे कीर्तन होईल. तर दुपारी १२ ते सायं. ७ वाजेपर्यंत महाप्रसाद देण्यात येईल. तसेच सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत स्वरेशा पोरे व सहकाऱ्यांचा स्वरनाद प्रस्तुत गीत रामायण कार्यक्रम होणार आहे.