Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा अखेर पर्यटकांसाठी खुला झाला

पुणे – आता राज्यभरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील आठ महिन्यांपासून बंद असलेला पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मास्क घालून आणि सॅनिटायझरचा वापर करूनच पर्यटकांना याठिकाणी प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आता कोरोनामुळे काही महिने बंद असलेला मराठी साम्राज्याचा हा ऐतिहासिक ठेवा आता सर्वांना पाहता येणार आहे.

या शनिवारवाड्याच्या साक्षीने अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी बांधलेला हा शनिवारवाडा मराठी साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाची आणि पराक्रमाची साक्ष देणारा आहे. बाजीराव-मस्तानी यांची प्रेमकहाणी याच वाड्यातून बहरली होती. श्रीमंत सदाशिवभाऊ पेशवे यांच्या नेतृत्त्वाखाली याच शनिवार वाड्यातून मराठी मावळे पानिपतच्या मोहिमेवर गेले होते. श्रीमंत माधवराव पेशवे आणि श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांच्यातील संघर्ष आणि काका-पुतण्यातील वाद याच वाड्याने अनुभवला आहे. एकंदर हा ऐतिहासिक ठेवा पाहण्याची संधी आता पर्यटकांना मिळणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button