पुण्यात दोन ठिकाणी आग, अग्निशमन दलाकडून दोन्ही आग नियंणात
![Two fire incidents at Wanawadi jewellery shop and Tulshi Baug transformer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Pune-Two-Fire-Incidents-780x470.jpg)
पुणे : पुण्यात आज (१७ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास दोन ठिकाणी आगीच्या घटना घडली. पुण्यातील वानवडी आणि तुळशीबाग परिसरात पहाटेच्या सुमारास आग लागली. तर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी वा जिवीतहानी नाही.
वानवडी येथे पियुष ज्वेलर्स या दुकानात आगीची घटना तर तुळशीबागेत एका इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरला ही आग लागली होती. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सुदैवाने यामध्ये कोणीतीही जिवीतहानी नाही.
हेही वाचा – ‘मंत्रीपद मिळालं नाही तर राणे मला संपवतील..’; भरत गोगावलेंनी सांगितला मंत्रिपदाचा किस्सा
Pune: Two fire incidents at Wanawadi jewellery shop and Tulshi Baug transformer; no injuries reportedhttps://t.co/WHokNYuFHz #Pune #punenews
— PuneNow (@itspunenow) August 17, 2023
परमार पार्क सोसायटी, वानवडी सोळंके ज्वेलर्स दुकानाला आग लागली होती. कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र जवानांनी आग पूर्णतः विझवली सदरच्या कामगिरीत प्रभारी अधिकारी-कैलास शिंदे, तांडेल- महादेव मांगडे, चालक सत्यम चौखंडे, फायरमन सागर दळवी, निलेश वानखडे, दिनेश डगळे यांचा समावेश होता.