“खरी लढाई आत्ता सुरू..”; शुभांगी पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
आता मी शिवसैनिक म्हणून लढेन : शुभांगी पाटील
मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवेसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
एका सामान्या घरातील मुलीला इतकी मतं मिळाल्याबद्दल आभार. तसंच आता आम्ही थांबणार नाही. आता मी शिवसैनिक म्हणून लढेन, आम्ही सगळे एक आहोत. एक राहू, असं पक्षप्रवेशानंतर शुभांगी पाटील म्हणाल्या.
सगळ्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती, ती मी पूर्ण करेन असंही त्यांनी सांगितले होते. पण कुठे तरी मी कमी पडली असेन. नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार, उद्धव ठाकरे सगळ्यांचा आधार होता, असंही शुभांगी पाटील म्हणाल्या.
शुभांगी पाटील यांचा अधिकृत शिवबंधन बांधून शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश झाला. लवकरच त्यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी दिली जाईल, असं खासदार संजय राऊत म्हणाले. शुभांगी पाटील अत्यंत जोमाने लढल्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला, असंही संजय राऊत म्हणाले.