Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

Indrayani Thadi 2023 : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे यांची ‘इंद्रायणी थडीला’ भेट

पिंपरी-चिंचवड : भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून इंद्रायणी थडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इंद्रायणी थडी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती दर्शवली होती. त्यातच आता शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी भेट दिली.

प्रसार माध्यमांशी बोलताना संभाजी भिडे गुरुजी यांनी आमदार महेश लांडगे यांच्यावर वर्षाव केला आहे.इंद्रायणी थडी महोत्सव पाहून मी भारावून गेलो. महेशदादाचे हे काम पाहून भारताचे भविष्य सक्षम हातात आहे, असे वाटते असं संभाजी भिडे गुरुजी यांनी म्हटल आहे.

इंद्रायणी थडी महोत्सवात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा सत्कार संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार महेश लांडगे यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचे जीवन लोकांच्या कल्याणासाठी जावो, असंही संभाजी भिडे गुरुजी म्हणाले आहेत.

या इंद्रायणी थडी महोत्सानिमित्त अनेक मान्यवर भेट देत आहेत.यात्रेत ग्राम संस्कृती, मावळ्यांचा इतिहास, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, बालजत्रा आ अबशा विविध प्रकारच्या आकर्षक गोष्टी पाहायला मिळत आहेत.इंद्रायणी थडी महोत्सवाला पिंपरी चिंचवडकरांचा प्रचंड प्रतिसाद पहायला मिळत आहे. त्यातच आता संभाजी भिडे गुरुजी यांनी इंद्रायणी थडीला भेट देत आमदार महेश लांडगे यांच्या विषयी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button