Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईमध्ये सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांची होणार पूर्ण तपासणी

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचे पवित्र वातावरण आहे. घरोघरी गणपतीचे आगमन झालं आहे. सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार असला तरी उत्साह मात्र तसाच आहे. मुंबईमध्ये सार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांची पूर्ण तपासणी होणार आहे. या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती केली आहे. आगामी सणासुदीच्या कालखंडात विविध मंडळांतर्फे उत्सव साजरे केले जातील, त्या अनुषंगाने उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याची जबाबदारी या पथकांवर सोपवण्यात आली आहे.

मंडप तपासणी बाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार, महानगरपालिका क्षेत्रामध्ये सार्वजनिक सण, उत्सव, समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदार, नायब तहसीलदार अथवा त्यावरील अधिकाऱ्यांच्याचे मंडप तपासणी पथक गठीत केले जाते. उत्सव सुरु होण्यापूर्वी मंडप तपासणी करुन त्याचा अहवाल संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करणे आवश्यक आहे. यानुसार मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 3 समिती व 9 पथकांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, गणेश चतुर्थी कार्यक्रमांची परवानगी नाकारली गेली आहे. अशा उत्सवांच्या वेळी होणारी गर्दी नियंत्रण करणे अवघड ठरते, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button