Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज्य सरकारकडून ‘मिशन बिगीन अगेन’च्या नियमात बदल

मुंबई |  मुंबई शहर आणि आजुबाजूच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये प्रवासासाठी लॉकडाऊनमध्ये घातलेले निर्बंध सरकारने उठवले आहेत. त्यामुळे या भागात प्रवास करण्यासाठी आता कोणत्याही पासची गरज नाही. राज्य सरकारने आधी जारी केलेल्या नियमावलीत तसे बदल केले आहेत. राज्य सरकारने मिशल बिगेन अगेन अंतर्गत जारी केलेल्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर विभागात (MMR) प्रवासाचे निर्बंध शिथिल केले आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ या भागात आता नागरिकांना पासशिवाय प्रवास करता येणार आहे. याआधी अत्यावश्यक सेवा आणि तातडीच्या कामासाठी पास घेऊनच प्रवास करण्याची मूभा होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. खाजगी कार्यालये दहा टक्के उपस्थितीत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ८ जूनपासून खाजगी कार्यालये १० टक्के किंवा १० कर्मचारी यापैकी जो आकडा जास्त असेल त्या क्षमतेने खाजगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण ७ जूनपासून सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. विद्यापीठ, कॉलेज आणि शाळा यातील शिकवण्याचे काम सोडून इतर कामे सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यात ऑनलाईन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्यासाठीच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावता येईल, असे नियमावलीत म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button