Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
केंद्र सरकारकडून कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न – अनिल देशमुख
मुंबई | केंद्र सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. काही जणांना वाचवण्यासाठीच केंद्राने हा तपास ‘एनआयए’कडे दिल्याचा खळबळजनक आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. विशेष तपास पथकाकडून (SIT) कोरेगाव-भीमा प्रकरणाची सखोल चौकशी झाली असती.
केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करून राज्य सरकारची कोणतीही परवानगी न घेता हा तपास एनआयएकडे सोपविला. ही कृती राज्यघटनेच्या विरोधात आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी आता कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात कोरेगाव भीमावरून केंद्र आणि राज्यातला संघर्ष आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे.





