Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पटेल, तटकरेंसह राष्ट्रवादीचे २२ आमदार भाजपमधून लढणार; रोहित पवारांचा दावा

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत घडामोडींनी वेग घेतला असतानाच, आमदार रोहित पवार यांनी एका मोठ्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे २२ आमदार आगामी विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नेमके काय सुरू आहे, या चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे २२ आमदार भाजपमध्ये जाणार असून तेथूनच विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्या पक्षात काय सुरू आहे हा त्यांचा विषय असला, तरी अनेक नेते सध्या अस्वस्थ आहेत.” राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून या नेत्यांना ‘डिमोट’ केल्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. “सकाळी एखादा धाडसी निर्णय घेणे आणि नंतर ट्विट करून त्यात बदल करणे, हे त्या पक्षात सध्या काय सुरू आहे हे दर्शवते,” असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा

नाशिक ‘टीसीएस’ प्रकरण: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या अवैध घरावर महापालिकेचा ‘बुलडोझर’

सुनील तटकरे यांनी काल तब्बल तीन वर्षांनंतर शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर भेट घेतली. या भेटीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, “तटकरे यांना कदाचित सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा. किंवा त्यांना त्यांच्या अध्यक्षांना (सुनेत्रा पवार) काही निरोप द्यायचा असेल म्हणून त्यांनी ही भेट घेतली असावी.” ही सदिच्छा भेट असल्याचे तटकरेंनी सांगितले असले, तरी रोहित पवारांनी याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले आहे.

अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यावर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, “अजित दादांना न्याय मिळवून देण्यासाठी आधी आवाज उठवा, उगीच डोळ्यात पाणी आणून काही होणार नाही.” तसेच, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आमचा पक्ष भाजपसोबत कधीही विलीन होणार नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button