breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

मोदी सरकारच्या तिजोरीत येणार ८०,००० कोटी?

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ही भारत सरकारचीही बँक आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँकेच्या उत्पन्नामध्ये केंद्र सरकारचाही वाटा असतो. या वर्षी सरकारला केंद्रीय बँकेकडून एकूण ८०,००० कोटी रुपयांची कमाई होणार आहे, जी सरकारच्या अंदाजपत्रकापेक्षा दुप्पट असू शकते. या वर्षी परकीय चलनाच्या व्यवहारातून आरबीआयला खूप मोठा नफा झाला आहे.

रेपो दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे मध्यवर्ती बँकेसह स्थानिक बँकांचे उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँकेचा नफा वाढला आहे, ज्यामुळे ती सरकारला सुमारे ८०,००० कोटी रुपयांचा लाभांश देऊ शकते.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल ‘या’ दिवशी लागणार

आयडीएफसी फर्स्ट बँकेतील अर्थतज्ज्ञ गौरा सेनगुप्ता म्हणतात की, या वर्षी आरबीआयचा लाभांश बजेट अंदाजापेक्षा जास्त असू शकतो. ते ७०,००० ते ८०,००० कोटींच्या दरम्यान अपेक्षित आहे. केंद्रीय बँकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडे ३०,३०७ कोटी रुपये सरप्लस म्हणून हस्तांतरित केले होते. यंदा २०२२-२३ आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान आरबीआयने २०६ अब्ज डॉलरचा विक्रमी विदेशी चलन व्यवहार केला होता. मागील आर्थिक वर्षात ते केवळ ९६ अब्ज डॉलर होता, असं ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button