TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पहिल्या दिवशी 74 गोल ; मणिपूर, कर्नाटक, पुड्डुचेरी, पंजाब, चंडिगडचा मोठा विजय

पिंपरी चिंचवड | 11 व्या वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पहिल्याच दिवशी गोलांचा पाऊस पडला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या 5 सामन्यात तब्बल 74 गोल नोंदवले गेले. यातील सर्वांत मोठा विजय मणिपूरचा ठरला. त्यांनी त्रिपुराचा 21-0 असा धुव्वा उडवला.सकाळी सी गटात झालेल्या सामन्यात कर्नाटकाने जम्मू काश्मिरचा 14-0 असा पराभव केला. मेजर ध्यानचंद स्टेडियमच्या निळ्या सुपर टर्फवर आज कर्नाटकाने दुसऱ्या मिनिटापासून गोल धडाका सुरु केला. मोहंदम राहिलने दुसऱ्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर सामन्याच्या 60 व्या मिनिटाला शामंथने त्यांचा अखेरचा गोल केला.या दरम्यान राहिल, सोमण्णा, पुनित, भरत, लिखित बीएम यांनी प्रत्येकी दोन गोल केले. एस. दिक्षित, चिरंथ सोमण्णा, कुमार यासित आणि शामंथ यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. याच गटात पुड्डुचेरी संघही काही कमी पडला नाही. त्यांनी अरुणाचल प्रदेशाचा मध्यंतराच्या 8-0 अशा आआघाडीनंतर 14-0 असा पराभव केला.

या सामन्यात तर पहिल्याच मिनिटाला गोल झाला. अरुण कुमारने हा गोल केला. त्यानंतर चार गोल करणाऱ्या विथामिझाने याने 58व्या मिनिटाला अखेरचा गोल केला. अरुणकुमार यानेही चार गोल केले. रणजितने तीन आणि तामिलारसन, पुवीयारासन, सेलामुथु यांनी एकेक गोल करून त्यांना सुरेख साथ केली.ड गटात ऑलिंपियन रुपिंदर पालच्या पंजाबने उत्तराखंडला 11-0 असे हरवले. लोवप्रित जनिथने हॅटट्रिकसह चार गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. सुदर्शन सिंगने दोन, तर परमजीत, विशाल यादव, गुरुशहजाद पीरझाजा, गौतम कुमार आणि रुपिंदर पाल यांनी एकेक गोल केला.ई गटात चंडिगडने मोहित आणि अमनदीपच्या हॅटट्रिकच्या जोरावर राजस्थानवर 14-0 अशी मात केली. वीर अंगद सिंग, हरप्रीत सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले. राजवीन सिंग, योगराज सिंग, जसप्रीत सिंग यांनी एकेक गोल केला. याच गटात आजचा सर्वांत मोठा विजय नोंदवणाऱ्या मणिपूरने 21 गोल केले.

सामन्याच्या दुसऱ्या मिनिटापासून सुरु झालेल्या त्यांचा गोल सिलसिला 60 व्या मिनिटापर्यंत सुरू होता. मंतोष लैश्राम मैतेई, दिनचंद्रा मोईरंगथेम आणि भारक निन्गोम्बाम यांनी हॅटट्रिकसह चार गोल केले. अबुंग निन्गोबाम सिंग, रेहित केईशाम यांनी प्रत्येकी दोन, तर इबुंगो सिंग, देबेशोर कोंजेन्गबाम सिंग, दयानंदा चामंथबाम सिंग, डॉलर क्षेत्रीमायुम, रोमेशकुमार हेईस्नाम सिंग यांनी एकेक गोल केला.

निकाल –

कर्नाटक वि जम्मू आणि काश्मिर – (कर्नाटक विजयी)
पुड्डुचेरी वि अरूणाचल ( पुड्डुचेरी विजयी)
पंजाब वि उत्तराखंड (पंजाब विजयी)
चंदीगड वि राजस्थान ( चंदीगड विजयी)
मणिपूर वि त्रिपूरा (मणिपूर विजयी)
आंध्र प्रदेश वि अंदमान व निकोबार ( अंदमान व निकोबार संघ उपस्थित न राहिल्याने आंध्र प्रदेश संघाला सामना बहाल करण्यात आला.)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button