breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत 676, पुण्यात 180 नवे कोरोना रुग्ण; राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या अडीच लाखांपर्यंत

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दुसऱ्या लाटेपासून महाराष्ट्राला दिलासा मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार ७७ नवे रुग्ण सापडले असून १८४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ३३ हजार रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. मे महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत रुग्णसंख्या ६० हजारांपेक्षा जास्त वाढू लागली. तसंच, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था ढासाळली, वैद्यकीय सुविधांची टंचाई जाणवू लागली, परिणामी अनेक रुग्णांचा उपचारांभवी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकरी ठरली.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ५३ हजार ३६७ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी ती देखील घटत आहे. पुण्यात एकूण ३६ हजार ५६३ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २४ हजार ८५० इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १८ हजार ४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार ५५७ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ११ हजार २५२ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार ६३४ इतकी आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने एप्रिल महिन्यात लॉकडाऊन पुकारण्यात आला. हा लॉकडाऊन आता १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनचा परिणाम म्हणून नियमित वाढणाऱ्या रुग्णांची संख्या आता कमी कमी होत जातेय. गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार ७७ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बाधित झालेल्या एकूण बाधितांची संख्या ५७ लाख ४६ हजार ८९२ झाली आहे. तर, सध्या २ लाख ५३ हजार ३६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button