breaking-newsमुंबई

65 वर्षांवरील कलाकारांना चित्रीकरणासाठी घातलेली बंदी सरकारने मागे घ्यावी : अभिनेता मनोज जोशी

मुंबई  : चित्रपसृष्टीतील कलाकार, निर्मात्यांची नामवंत संघटना सिंटाचे वरिष्ठ व्हॉईस प्रेसिडेंट अभिनेते मनोज जोशी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
65 वर्षांवरील कलाकारांना चित्रीकरणासाठी घातलेली बंदी सरकारने मागे घ्यावी आणि कलाकारांना चित्रीकरणासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मनोज जोशी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. याबाबत योग्य तो विचार विनिमय करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल अशी आशा मनोज जोशी यांनी व्यक्त केली.

याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनाही याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केल्याचं मनोज जोशी यांनी सांगितलं. राजभवनावर मनोज जोशी आणि राज्यपाल यांच्यामध्ये सुमारे 40 मिनिटे चर्चा झाली.

मनोज जोशी म्हणाले, “स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार असलेल्या सन्माननीय राज्यपालांनी महात्मा गांधींवर एक निबंध लिहिला. टपाल खात्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि बक्षीसही मिळवले. या बक्षिसाच्या रकमेत तिप्पट रकमेची भर घालून त्यांनी कोरोना काळात लढणाऱ्या आणि ड्युटी वर तैनात असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या कर्मचार्‍यांना ती भेट दिली”.
राज्य भाजपा सचिव आणि महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएफएसडीसीएल) चे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्यासमवेत शाल,श्रीफळ आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन राज्यपालांचा सन्मान केला. त्यानंतर मनोज जोशी यांनी मा. राज्यपालांना CINTAA चा इतिहास, सदस्यांविषयी, ज्येष्ठ नागरिकांविषयी माहिती दिली. या क्षेत्रातील ज्या कलाकारांचं कुटुंब आणि त्यांची उपजीविका केवळ कलेवर, अभिनयावर अवलंबून आहे. त्यांच्या विषयीही मनोज जोशी यांनी राज्यपालांसोबत संवाद साधत चर्चा केली. आता या बाबत राज्यपाल आणि महाराष्ट्र शासन काही ठोस निर्णय घेणार का ? या कडे चित्रपट सृष्टीच्या नजरा लागली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button