ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

रेल्वे स्थानकावर सापडले ६ लाखांचे दागिने, महिलेने जे केले त्याने तुम्हालाही अभिमान वाटेल

जळगाव| नियमित दरोडा, चोरी, गुन्हेगारीच्या बातम्या वाचल्या की आजच्या युगात प्रामाणिकपणा माणुसकी शिल्लक आहेत का, असा प्रश्न पडतो. मात्र आजच्या जगातही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचा प्रत्यत नुकताच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात आला. पाचोरा रेल्वे स्थानकावरील सफाई कामगार महिलेने तिला सापडलेले तब्बत ६ लाख ६ हजार ८०९ रुपये किंमतीचे १२९.६६० वजनाचे दागिणे पोलिसांकडे सुपूर्द करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. महिलेने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल तिची जिल्ह्यात एकच चर्चा सुरु आहे.

याबाबत पाचोरा लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रेल्वे महिला सफाई कामगार उषाबाई गायकवाड या ड्युटीवर असताना रेल्वे स्टेशन परिसर साफ सफाई करण्यात व्यस्त होत्या. दरम्यान, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जमा केलेला कचरा फेकण्यासाठी त्या रेल्वे स्थानकानजीक गेल्या असता त्यांना कचरा फेकण्याच्या ठिकाणी एक निळ्या रंगाची पिशवी आढळून आली. ही पिशवी उषाबाई गायकवाड यांनी रेल्वे सफाई विभागाचे सुपरवायझर शरद पाटील यांच्याकडे दिल्यानंतर शरद पाटील आणि त्यांचे सहकारी पिशवी घेऊन लोहमार्ग पोलीस ठाण्यात गे

तेथे कार्यरत सहाय्यक फौजदार ईश्वर बोरुडे यांना दाखवली असता ईश्वर बोरुडे यांनी सर्वांसमोर पिशवी उघडली असता त्यांना पितळी धातुचा एक हार, चार बांगड्या, एक पेंडल, एक जोड कानातील रिंग, एक जोड साखळी टाप्स आणि एक गळ्यातील चैन आढळून आले. दरम्यान ईश्वर बोरुडे यांनी दोन सरकारी पंचासह पंचनामा करुन सदरील मुद्देमाल पाचोरा येथील सराफ असोसिएशनकडे नेवून सदरच्या ऐवजाची तपासणी केली असता आढळुन आलेला ऐवज हा सोन्याचा असल्याचे निष्पन्न झाले.

त्या ऐवजाचे वजन केले १२९.६६० ग्रॅम इतके इतके असून ते दागिने तब्बल ६ लाख ६ हजार ८०९ रुपये किंमतीचे असल्याची खात्री झाल्यानंतर ईश्वर बोरुडे यांनी सदरचा प्रकार त्यांचे वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरिक्षक किसन लाख यांना कळविल्यानंतर ते देखील पाचोरा येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाले. पंचनामा करत सापडलेले बेवारस सोन्याचे दागिने ईश्वर बोरुडे यांनी किसन राख यांच्या स्वाधीन केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button