ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

पोलिस अधीक्षकांच्या बंगल्याशेजारच्या भिंतीवर लिहिला आक्षेपार्ह संदेश

जळगाव | जळगाव शहरातील मुख्य गजबजलेला चौक म्हणजे काव्य रत्नावली चौक. याच चौकालगत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे निवासस्थान ‘अभय’ असून या पोलीस अधिक्षकांच्या बंगल्याला लागूनच असलेल्या भिंतीवर अज्ञातांनी आक्षेपार्ह संदेश लिहल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकाराने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कारभाराचा निषेध म्हणून हा संदेश व्हायरल केल्याची शक्यता व्यक्त होत यातून संबंधितांनी थेट पोलीस विभागालाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील गजबजलेला व सुशोभत चौक म्हणून ओळख असलेल्या काव्यरत्नावली चौक याठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ असते. याच चौकात जिल्हा पोलीसदलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचे निवासस्थान ‘अभय’ आहे. पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानाला मेहरुणकडे एक रस्ता जातो. या रस्त्यालगत फूटपाथला लागून असलेल्या या भिंतीवर अज्ञातांनी हा आक्षेपार्ह संदेश लिहिला.

भिंतीवरील संदेश तातडीने मिटवला

पोलीस विभागाचा निषेध म्हणून अनोळखी व्यक्तींनी हा संदेश लिहला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र हा संदेश लिहून संबंधितांनी थेट पोलीस विभागाला आव्हान दिल्याचेही बोलले जात आहे. तर दुसरीकडे वर्दळीच्या चौकात पोलिसांच्याच विरोधात पोलीस अधीक्षकांच्याच बंगल्या शेजारी संदेश लिहण्याची हिंमत केल्याने पोलिसांचा धाक संपला की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकाराची पोलीस अधीक्षकांकडून तातडीने दखल घेण्यात आली. रविवारी दुपारी भिंतीवरील हा संदेश मिटविण्यात आला. भिंतीवर, ‘Fxxx the System’ असा संदेश लिहिला होत

गुन्हा दाखल करुन संबंधितांवर कारवाई करणार

याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित भिंत ही महापालिकेची मालमत्ता आहे. त्यामुळे महापालिकेची मालमत्ता असलेल्या या भिंतीवर विना परवाना अशा प्रकारचा संदेश लिहल्याने संबंधितांविरोधात डेमोस्ट्रेकली प्रॉपर्टी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच त्याचा शोध घेण्यात येवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले. महापालिकेने जर तक्रार दिली नाही तर पोलीस स्वत: फिर्यादी होवून गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे म्हणाले

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button