breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोविड उपाययोजनेकरिता तब्बल ६ कोटी खर्च

  • प्राणवायू आणि औषधांचा खर्च गुलदस्त्यात, दोन महिन्यांत महानगरपालिका आर्थिक संकटात

भाईंदर |

गेल्या दोन महिन्यांपासून वाढत असलेल्या करोना आजाराच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्याकरिता पालिका प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. यात केवळ उपाययोजनेकरिता पालिकेचे ६ कोटी २३ लाख रुपये खर्च झाले असून प्राणवायू आणि औषधाचा खर्च अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या पालिका प्रशासनाला गंभीर प्रमाणात निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे.  करोनाची दुसरी लाट आल्यामुळे मिरा-भाईंदर शहरात करोनाचा प्रसार अधिक झपाटय़ाने झाला आहे. सोमवारी समोर आलेल्या अहवालानुसार १४९ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून एकूण आकडा ४८ हजार २२३ वर जाऊन पोहोचला आहे. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूचा आकडा १ हजार २४८ इतका झाला आहे. यात गेल्या दोन महिन्यांतच २० हजार ५०० रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला असून ४४३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे शहरात शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचाराकरिता खाटा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याकरिता पालिका प्रशासनाकडून टाळेबंदी नियम लागू करण्यात आला आहे.

तसेच उपाययोजना आखून अधिकाधिक रुग्णांची करोना चाचणी करून त्यांच्या उपचारावर भर देण्यात येत आहे. याकरिता पालिका प्रशासनाने गोल्डन नेस्ट, डेल्टा आणि समृद्धी अशी तीन कोविड विलगीकरण केंद्रे उभारली असून प्रमोद महाजन, मीना ताई ठाकरे आणि अप्पासाहेब धर्माधिकारी अशा तीन नव्या कोविड रुग्णालयांची निर्मिती केली आहे. त्यामुळे या रुग्णालयात आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याकडे प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. यात प्रामुख्याने जेवण, औषध, प्राणवायू, खाटा आणि लसीकरण केंद्रनिर्मितीचा समावेश आहे. एकीकडे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे आर्थिक स्रोत थंडावले असल्यामुळे प्रचंड प्रमाणात निधीची कमतरता निर्माण झाली असताना दुसरीकडे केवळ उपाययोजनेवर ६ कोटी २३ लाख खर्च झाल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शिवाय प्राणवायू आणि औषधांचा खर्च याच्या तिप्पट असल्यामुळे तो पूर्ण करण्याकरिता राज्य शासनाकडे मदतीची मागणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्य लेखापरीक्षण अधिकारी शरद बेलवटे यांनी दिली.

  • लस खरेदी करण्यास प्रशासन असमर्थ?

मिरा-भाईंदर शहरात लसीकरण मोहीम राबवण्यात येत असली तरी लशीच्या कमतरतेमुळे वारंवार केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर शहराला आवश्यक असलेल्या एकूण लशीची जाहीर निविदा काढण्याची मागणी महापौर ज्योस्त्ना हसनाळे यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली आहे. त्यानुसार पालिका प्रशासन हालचाली करत असून निविदा प्रक्रिया राबवणार असल्याचे आयुक्त दिलीप ढोले यांनी स्पष्ट केले आहे. मात्र यासंदर्भात आपल्याकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याची माहिती लेखापरीक्षण अधिकारी शरद बेलवटे यांनी दिली. तर महानगरपालिका आर्थिक संकटात असून सद्य परिस्थितीत ही निविदा प्रक्रिया राबवण्यास प्रशासन असमर्थ असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या दोन महिन्यांतील खर्चाचा तपशील

जेवण ७८ लाख

साहित्य ४० लाख

अप्पासाहेब

कोविड केंद्र ५९ लाख

लिफ्ट ८२ लाख

रुग्णालये १ कोटी ६० लाख

लसीकरण केंद्रे १ कोटी ७३ लाख

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button