breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईत 1,362, पुण्यात 2,999 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 56,50,907 वर

मुंबई – राज्यात कडक निर्बंध लावलेले असतानाही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभरात 24,752 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 453 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 23,065 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 56,50,907 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 91,341 इतका झाला आहे. त्याचबरोबर राज्यात आतापर्यंत 52,41,833 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 3,15,042 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मागील महिन्यात सलग पाच हजारांहून अधिक विक्रमी दैनंदिन रुग्णवाढ होत होती. मात्र २६ एप्रिलपासून दररोज ५ हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद होत असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळत आहे. काल दिवसभरात मुंबईत 1,362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 34 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 1,021 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 7,01,266 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 14,742 इतका झाला आहे, तर आतापर्यंत 6,56,446 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 27,943 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच पुणे जिल्ह्यात मंगळवारी 2,999 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 10,03,329 वर पोहोचली असून काल दिवसभरात 453 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा 16,472 इतका झाला आहे. तसेच पुण्यात काल 5,744 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 9,51,718 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 709, पिंपरी-चिंचवडमधील 655 आणि ग्रामीण भागातील 1,472, इत्यादी रुग्णांचा समावेश आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button