breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश

Samruddhi Mahamarg Accident : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पोच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

हेही वाचा – पूजा करताना ठेवल्या जाणाऱ्या कलशाची पद्धत आणि नियम काय आहेत?

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नरेंद्र मोदींनी ट्विट करुन संभाजीनगरच्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघाताच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. तसेच, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना. प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून मदत व बचावकार्य सुरू असल्याचेही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले. तर, मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button