breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Budget 2022 : देशात येणार 5G, अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली | प्रतिनिधी 

इंटरनेट हा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा अविभाज्य भाग झाला आहे. सध्या आपण 4G तंत्रज्ञान वापरत आहोत. त्याआधी 3G आणि 2G हे तंत्रज्ञान होतं. आता मात्र यावर्षीपासून 5G तंत्रज्ञान येणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यांनी आज देशाचं बजेट मांडलं त्यामध्ये ही महत्त्वाची घोषणा केली.

सीतारामन यांनी सांगितलं की 2022 मध्ये खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या 5G मोबाइल सेवांसासाठी आवश्यक असलेले लिलाव अर्थात स्पेक्ट्रम ऑक्शन आयोजित केले जातील. ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणारं ब्रॉडबँड आणि मोबाईल कम्युनिकेशन हे सक्षम करण्याच्या दृष्टीने PLI योजनेचा भाग म्हणून 5G इकोसिस्टिमसाठी डिझाईन नेतत्वाखाली उत्पादनांची योजना सुरू करण्यात येईल. खिशाला परवडणारी ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागात त्याचा प्रसार करण्यासाठी निधी अंतर्गत वार्षिक संकलनाच्या पाच टक्के वाटप केलं जाईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जगभरात सुरु असलेल्या कोरोना महामारीचा उल्लेख केला. या महामारीच्या काळातही भारत आपली विकास यात्रा कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे, असं म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्था वैश्विक स्तरावर त्रास सहन करते आहे. मात्र या परिस्थितीतही आपण कोरोनाशी चांगला लढा दिला आहे असंही त्या म्हणाल्या.

या बजेटमध्ये पुढच्या 25 वर्षांची ब्लू प्रिंट असणार आहे असं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं. एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार आहोत. पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी रुपये देणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आत्तापर्यंत करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा

आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार

येत्या 3 वर्षात 400 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार

देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग सुरू केलं जाणार

2022-23 मध्ये आरबीआयचं डिजिटल चलन येणार

पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंग सुरू केलं जाणार

पोस्ट ऑफिसमधील खातेधारकांना एटीएम पुरवलं जाणार

पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित आहे

‘पंतप्रधान गती योजने’तंर्गत पायाभूत सुविधा उभारणार, पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटींचा निधी

2023 पर्यंत 25 हजार किमीचा महामार्ग उभारणार

पंतप्रधान आवास योजनेसाठी 48 हजार कोटींची नव्याने तरतूद

शालेय शिक्षणासाठी 100 टीव्ही चॅनेलची घोषणा, स्थानिक भाषेतून शिक्षण देणार

लघु आणि सुक्ष्म उद्योगांना दोन लाख कोटींचे अर्थसहाय्य

जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार

विविध शहरांची गरज ओळखून मेट्रोचे जाळं उभारणार

2022 मध्ये 5G सेवा सुरू होईल

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button