breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देहू ते निगडी पालखी मार्गावर महापालिका करणार वृक्षारोपण

पिंपरी – संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावर देहूपासून ते निगडीपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीवर हे काम करण्यासाठी सर्वसाधारण सभेत गुरुवारी (दि.20) उपसूचनेव्दारे मान्यता घेण्यात आली.

महापौर राहूल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून पंढरपूरच्या दिशेने जातो. त्यैपैकी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या पिंपरी-चिंचवडकर आतुरतेने वाट पाहत असतात. देहूगावातून पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर देहूरोड आणि नंतर निगडी भक्ती शक्ती चौकातून पालखी सोहळा पिंपरी-चिचंवडमध्ये दाखल होते.

पालखी सोहळ्याचा देहूगावपासून निगडीपर्यंतचा मार्ग महापालिका हद्दीत नाही. मात्र, तरीही पालखी सोहळ्य़ासाठी या मार्गावर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. देहूगाव ते भक्ती-शक्ती चौकापर्यंत आवश्यक वृक्ष लागवड कणे आणि त्यासाठी संरक्षक जाळ्या पुरविण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलाय यावर्षी पावसाळ्यात ही झाडे लावण्यास सुरुवात केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button