पिंपरी / चिंचवड

गांजाची विक्री करणा-या एकाला अटक : अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी l प्रतिनिधी

गांजाची विक्री करताना एक व्यक्ती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 9) दुपारी सव्वा बारा वाजता चहोली बुद्रुक येथे करण्यात आली.

रोहिदास बाबू ठोंबरे (वय 37, रा. च-होली बुद्रुक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार च-होली बुद्रुक येथील वाघेश्वरवाडी मधील रंजनाबाई चव्हाण यांच्या घराजवळ एक व्यक्ती किरकोळ स्वरुपात गांजा विकत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कारवाई करत रोहिदास ठोंबरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 15 हजार 200 रुपये किमतीचा 608 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button