breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीपुणे

‘एनसीईआर’मध्ये चौथी आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात

डॉ. एस. एल. नलबलवार यांच्याहस्ते उद्घाटन : देश- विदेशातून ७५ प्रबंधांचे सादरीकरण

पुणे : ‘एनसीईआर’ मध्ये चौथी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे पार पडली. पीसीईटी नूतन अंतर्गत नूतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयात चौथी आंतरराष्ट्रीय परिषद (ICCIP- 22 International conference on Communication and Information Processing) यशस्वीपणे पार पडली ही आंतरराष्ट्रीय परिषद Elsevier SSRN  सिरीजची चौथी व अनेक नामांकित सायटेशन असलेली परिषद होती.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन ‘डी. बाटू’ चे डीन डॉ. एस. एल. नलबलवार यांच्या हस्ते झाले. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाचे महत्त्व सांगितले.  आंतरराष्ट्रीय स्तरावर मलेशिया बेल्जियम, यु.के. यु.ए.इ. इत्यादी देशांसह संपूर्ण भारतातील १२ राज्यातून (उदा. गुजरात, केरळ,  मध्य प्रदेश, तमिळनाडू, बिहार राजस्थान, हरियाणा ) इत्यादी एकूण  ७५ प्रबंध प्राप्त झाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेकरता महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मोलाची कामगिरी केली.

सलग चार वर्ष अशा परिषदेचे आयोजन केल्याबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार, कार्यकारी संचालक गिरीश देसाई यांनी आनंद व्यक्त केला

या परिषदेकरिता एनएमआयइ  टी चे प्राचार्य. डॉ ललित कुमार वाधवा व एनसीइआरच्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे यांनी संयोजन केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button