breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘डब्लूटीई इन्फ्रा’ चा सामाजिक बांधिलकीचा आदर्श; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त विधायक उपक्रम

पिंपरी : पाणी प्रक्रिया आणि पुन:वापर क्षेत्रात आघाडीवर असलेल्या डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले. कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम घेण्यात आला.
चाकण येथे डब्लूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. ही कंपनी आहे. कंपनीचा १६ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कंपनतील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला.
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, इप्सिलॉन कार्बन कंपनीचे शरद पाटील, पंढरीनाथ विद्यालयाचे प्राचार्य व्ही. ए. घायवळ, डब्लूटीईचे संचालक अशोक कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, विनोद भोळे, नितीन घाडगे, रंगनाथ रणपिसे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कंपनीच्या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी आंबेगाव तालुक्यातील पंढरीनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, पोखरी येथील ३० गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. या शाळेमध्ये १० ते १५ किमी अंतरावरुन आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सामाजिक बांधिलकीतून कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.
कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच, कंपनीत ५ वर्षे यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला. कविता वाचन, फिश पॉन्ड, रॅम्प वॉक, गीत गायन, चैतन्य आणि चेतना कार्यक्रमही घेण्यात आला.
कंपनीचे आदर्शवत उपक्रम…
गेल्या १६ वर्षांच्या वाटचालीत कंपनीने देश-विदेशात उद्योग विस्तार केला आहे. यासोबतच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. माळीण दुर्घटनाग्रस्तांना मदत, तसेच दुर्गम भागातील विद्यार्थी, नागरिकांना शुद्ध पाण्याची सुविधा निर्माण करण्यात कंपनीने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, मिडगुलवाडीसह जवळपासच्या वस्तींवरील नागरिकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी प्रकल्प कार्यान्वयीत केला होता. तसेच, आषढ एकादशीनिमित्त पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप, अनाथ मुलांसाठी मदत असे विविध विधायक उपक्रम कंपनीच्या वतीने राबवण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button