breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी विधानसभा : बहल-पालांडे कार्यकर्त्यांचा संभ्रम; सुलक्षणा शिलवंत-धर यांचे ‘घड्याळ सुसाट’

नगरसेवक बहल-पालांडेंच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन पण…

नगरसेविका सुलक्षणा धर- शिलवंत यांनी पक्षाशी बांधिलकी कायम

पिंपरी । अधिक दिवे
पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांचा वाढदिवस (१४ जुलै)नुकताच साजरा झाला. कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांनी तोबा फ्लेक्सबाजी केली. शेकडो फलक लावण्यात आले. मात्र, बहुतांशी फलकांवरुन “घड्याळ” गायब आहे. त्यामुळे बहल यांच्या मनात काय चाललंय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेल्या १५ वर्षांपासून शहराच्या राजकारणात केंद्रबिंदू राहिलेल्या योगेश बहल यांच्या समर्थकांनी यावर्षी राष्ट्रवादीने नेते आणि चिन्हाला वाढदिवसाच्या बहुतेक जाहिरातींमध्ये स्थान दिले नाही. काही मोजक्या फ्लेक्सवर पक्षाचे अस्थित्व दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून याच प्रभागातील पक्षाच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर आणि बहल यांच्यामध्ये एकप्रकारचे शितयुद्ध सुरू आहे. “स्पर्श” प्रकरण आणि अन्य भ्रष्टाचाराचे आरोप करीत बहल यांनी सभागृहात अप्रत्यक्षपणे आपल्याच पक्षाच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांना अप्रत्यक्षपणे “लक्ष्य” केले होते, अशी चर्चा आहे.

दरम्यान, सुलक्षणा यांनी राष्ट्रवादीशी असलेली बांधिलकी कायम ठेवलेली पहायला मिळते. १२ जून रोजी सुलक्षणा यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांनी जोरदार फलकबाजी केली. त्यांच्या सर्वच फ्लेक्सवर घड्याळ आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो पहायला मिळाले.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांच्यासोबत सुलक्षणा शिलवंत- धर यांचा सलोखा आहे. त्याचा फायदा आगामी निवडणुकीत सुलक्षणा यांना होणार आहे. याउलट, ज्येष्ठ नगरसेवक यांच्या समर्थकांनी बहुतेक फ्लेक्सवर राष्ट्रवादीला टाळल्यामुळे बहल राष्ट्रवादीतून बाहेर पडतील का? असे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
वास्तविक, आगामी महापालिका निवडणुका एक की दोन सदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे चिन्ह वापरताना इच्छुक आणि आजी-माजी नगरसेवक सावध भूमिका घेताना दिसत आहेत.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=4260565917383726&id=100002910803882

सुजाता पालांडे भाजपामध्ये नाराज?

महापालिका निवडणूक- २०१७ मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट नाकारल्यामुळे सुजाता पालांडे यांनी भाजपात प्रवेश केला. योगेश बहल यांचा तगडा सामाना करीत पालांडे सभागृहात दाखल झाल्या आहेत. मात्र, पालांडे यांच्यासारख्या अनुभवी नगरसेविकेला भाजपाकडून अपेक्षीत न्याय मिळाला नाही, अशी पालांडे समर्थकांची भावना आहे. त्यामुळे ३ जुलै रोजी साजरा झालेल्या वाढदिवसानिमित्त पालांडे समर्थकांनी दिमाखात फ्लेक्सबाजी केली. मात्र, या फलकांवरुन ‘कमळ’ गायब झालेले पहायला मिळाले. भाजपाचे पदाधिकारी वगळता अन्य समर्थक आणि कार्यकर्त्यांनी भाजपाला जाहिरात फलकांवर स्थान दिलेले नाही. त्यामुळे सुजाता पालांडे भाजपावर नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button