breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा तडाखा

मुंबई- मुंबईसह उपनगर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. शिवाय पुढच्या 3 ते 4 तासांत रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.

दिवा, डोंबिवली, कल्याण आणि ग्रामीण भागात सुद्धा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. मलंगगड परिसरात जोरदार हवा सुटली असून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या वीस मिनिटांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी चिंतातूर झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button