breaking-newsताज्या घडामोडी

40 बचतगटांनी तयार केले तब्बल 1 लाख 12 हजार मास्क

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मास्कचं उत्पादन राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यातील बचतगटही यात हातभार लावतायत…याचच उदाहरण म्हणजे नगर जिल्ह्यातील ४० बचतगटांनी तब्बल १ लाख १२ हजार मास्क तयार केले आहेत.

एरवी बचत गटांकडून खाद्य पदार्थांसोबतच मसाले, कपड्यांवरील कलाकुसर, गृहोपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, पेंटींग आदी वस्तू मोठ्या प्रमाणात तयार केले जातात… राज्यात ठिकठिकाणी भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात या वस्तूंना मोठी मागणी असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील ४० बचतगटांनी तब्बल १ लाख १२ हजार मास्क तयार केले आहेत. विशेष म्हणजे, यातील १ लाख ८ हजार मास्कची विक्री सुद्धा करण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या शहरांतील नागरिकांवर मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं साहजिकच ‘मास्क’ना मागणी वाढली आहे. त्यामुळे या काळात राज्यातील बचतगट मोठ्या प्रमाणात मास्क तयार करत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नगर जिल्ह्यातील ४० बचतगटांनी तब्बल १ लाख १२ हजार मास्क तयार केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button