breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

…’या’ देशाने कोरोनावर तयार केली लस

नवी दिल्ली | प्रथमच कोरोना विषाणूविरूद्ध तयार करण्यात आलेल्या लसने माकडांना कोरोना संक्रमणापासून वाचवले आहे. हे यश एका चीनी औषधी कंपनीने मिळवले आहे. कंपनीने रेसस मकाव माकडांना लस दिली. त्यानंतर, तपासात असे आढळले की या माकडांना कोरोना विषाणूचं संक्रमण झालं नाही. कंपनीने 16 एप्रिलपासून मानवांवर या लसची चाचणी सुरू केली आहे. चीनची राजधानी बीजिंग येथील औषधनिर्माण कंपनी सिनोवॅक बायोटेक कंपनीने 8 माकडांना आपल्या नवीन लसीचे वेगवेगळे डोस देण्याचा दावा केला आहे.

तीन आठवड्यांनंतर त्यांनी माकडांची पुन्हा तपासणी केली. तपासणीचे निकाल आश्चर्यचकित करणारे होते. कोरोना विषाणूची लस म्हणून ट्यूबद्वारे माकडांच्या फुफ्फुसात सोडण्यात आले. तीन आठवड्यांनंतर, तपासणीत असे दिसून आले की आठ माकडांपैकी कोणालाही कोरोना विषाणूची लागण झालेली नाही. सिनोवॅकचे वरिष्ठ संचालक मेंग विनिंग म्हणाले की, ज्या माकडला सर्वाधिक डोस देण्यात आल्या त्या माकडात सात दिवसांनंतर त्याच्या फुफ्फुसात किंवा शरीरावर कोरोना विषाणूचा कोणताही परिणाम दिसला नाही. काही माकडांमध्ये थोडा परिणाम दिसला परंतु त्यावर नियंत्रण ठेवण्यात यश आले. सिनोवॅकने 19 एप्रिल रोजी माकडांच्या चाचणीनंतर बायोरेक्स वेबसाइटवर लस अहवाल प्रकाशित केला. माकडांवरील आश्चर्यकारक निकालानंतर मेंग विनिंग म्हणाले की आमचा विश्वास आहे की या लसीचा मानवांवरही चांगला परिणाम होईल.

मेंग विनिंग म्हणाले की, आम्ही लस विकसित करण्याची जुनी पद्धत अवलंबली आहे. प्रथम माकडाला कोरोनाव्हायरसने संक्रमित केले. त्यानंतर त्याच्या रक्ताने एक लस बनविली. त्याला दुसर्‍या माकडात ठेवलं. अशा प्रकारे, गरीब देशांना महागड्या लसांची गरज भासणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button