breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम राहणार; तर, 5 ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट आणि बार खुले होणार

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आले आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र त्याचसोबत Unlock 5 चे देखील गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना महाराष्ट्रात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जाहीर करताना आणखी काही बाबतीत दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक करोना बाधित रुग्ण आहेत. ही रुग्णसंख्या सातत्याने वाढत चालली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे असल्याने चिंता कायम आहे. ही स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनलॉक प्रक्रियेदरम्यान अत्यंत सावधपणे पावले टाकत आहेत. राज्यात अनलॉकच्या पुढच्या टप्प्यात अपेक्षेप्रमाणे रेस्टॉरंटचालक आणि डबेवाल्यांना दिलासा देण्यात आला आहे. त्याचवेळी रेल्वे प्रवासावर लक्ष केंद्रीत करताना महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. लोकल पूर्ववत कधी सुरू होणार हा प्रश्न कायम असला तरी त्या दिशेने महत्त्वाची पावले टाकली जात असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ५ ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट आणि बार खुले होणार आहेत. ५० टक्के क्षमतेने ते चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पर्यावरण विभागाकडून स्वतंत्र गाइडलाइन्स जारी करण्यात येणार आहेत. त्यात कोणती खबरदारी घ्यायची आहे, याबाबत निर्देश देण्यात येणार आहेत.

राज्यातंर्गत रेल्वेसेवेला देखील सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. कोरोनाबाबतचे नियम व अटी पाळून रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात मुंबई-पुणे रेल्वेसेवेला परवानगी देण्यात आल्याने हजारो नोकरदारांना दिलासा मिळणार आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत लोकल धावत आहेत. या लोकलच्या संख्येत वाढ करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

राज्यात शाळा, कॉलेज, अन्य शैक्षणिक संस्था तसेच कोचिंग क्लासेस तूर्त बंदच राहतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय चित्रपटगृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, मॉलमधील थीएटर्स, ऑडिटोरियम, सभागृहे याबाबतही तूर्त कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.

राज्य सरकारकडून मुंबईच्या डबेवाल्यांनाही खूप मोठा दिलासा देण्यात आला आहे. डबेवाले आता लोकलमधून प्रवास करू शकणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात ते लोकलने प्रवास करू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना मुंबई पोलीस आयुक्तालयातून क्यूआर कोड घ्यावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button