breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेश

Israel-Palestine Crisis : इस्त्रायलमध्ये २७ भारतीय अडकले, राज्यसभा खासदाराचाही समावेश

Israel-Hamas Conflict : स्लामी कट्टरवादी गटाने अचानक इस्त्रायलवर हल्ला केला आहे. यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने देखील गाझामध्ये अनेक हवाई हल्ले केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दरम्यान, या युद्धजन्य परिस्थिती असलेल्या इस्त्रायलमध्ये २७ भारतीय नागरिक अडकले असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये एका राज्यसभा खासदाराचाही समावेश आहे.

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. ताज्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालय आणि आमच्या भारतीय मिशनच्या प्रयत्नांतून, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष क्षेत्रात अडकलेल्या मेघालयातील आमच्या २७ नागरिकांनी सीमा ओलांडली आहे. ते आता इजिप्तमध्ये आहेत. हे सर्व सुखरूप आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्रात चार चाकी वाहनांना टोल नाही’; देवेंद्र फडणवीस यांचा दावा 

दरम्यान, हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इस्रायलला गेलेली हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नुसरत भरूचा रविवारी दुपारी मायदेशी परतली. हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्याने तिथे युद्धजन्य परिस्थती निर्माण झाली आहे. अशा वेळी नुसरत या देशात अडकली होती. मात्र ती आता सुखरूप भारतात परतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button